बल्लारपूर वन विभागाची कारवाई
डुक्कराचे मांस विक्री करताना घेतले ताब्यात
विसापूर : बल्लारपूर शहरातील सास्ती पुलाजवळ रान्डुक्कराची शिकार करून मासांची विक्री करत असल्याची माहिती बल्लारपूर वन विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून वन विभागाच्या पथकाने ७ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई बल्लारपूर वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांच्या सोबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि. ७) मे रोजी केली. यामुळे वन्य प्राण्याची शिकार करणाऱ्या टोळीचे धाबे दणानले आहे.
. रान्डुक्कराची शिकार करून मांस विक्री करणारे आरोपी म्हणून श्रीकृष्ण पवार, सदाशिव देवगडे दोन्ही रा.हिरापूर, वसंत तोडेकर रा. बल्लारपूर, तोमय्या धोबेल्ला रा. बल्लारपूर यांना रान्डुक्कराच्या १0 किलो मांस सह ताब्यात घेतले.
. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीकडून अधिक चौकशी केली असता, रान्डुक्कराची शिकार करून मांस विक्री केल्याची कबुली दिली. वन्य प्राण्याचे मांस आम्ही बल्लारपूर येथील सुनील तुमराम, सावन बरसे, जाणी गाजुल्ला यांनी वसंत तोडेकर यांच्या मार्फत मांस विकत घेतल्याचे सांगितले. सर्व आरोपीवर वन्य जीव ( संरक्षण ) अधिनियम १९७२ च्या कलम २,९,39,४४,५१ व ५२ अन्वये प्राथमिक वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात २ मोटार सायकल, इतर साहित्य व रोख रक्कम १६ हजार ८१0रुपये जप्त करण्यात आले.
. या प्रकरणाचा अधिक तपास मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहायक वनसरक्षक आदेशकुमार शेडगे यांच्या मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करत आहे. ही कारवाई बल्लारपूर वन वनपरीक्षेत्र कार्यालयातील ए.एस.पठाण, के.एन. घुगलोत, बी.टी. पुरी, सुधीर बोकडे, तानाजी कांबळे, परमेश्वर आनकडे, सुनील नननावरे, धर्मेंद्र मेश्राम, ए.बी.चौधरी, एस.एस.नैता म,एस आर. देशमुख यांच्या पथकाने केली.


