राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अॅड. युवराज धानोरकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

42

भद्रावती : येथील राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा भद्रावती येथील फेरीलैंड स्कुलचे संचालक अॅड. युवराज धानोरकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

.    मुंबई, वरळी येथील एनएससिआय सभागृहात पक्षाच्या दिनांक २१ मार्च गुरुवारला आयोजित आढावा बैठकीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षाचे सचिव संजय मोरे, वन व आपत्ति पुनर्वसन मंत्री संजय राठोड, पुर्व विदर्भ संघटक किरण पांडव, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय पईतवार, राज्य कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे, चंद्रपूर जिल्हा प्रमुख नितीन मत्ते व बंडू हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

.     युवराज धानोरकर यांच्या या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिक मजबुत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पक्षप्रवेश केल्यामुळे युवराज धानोरकर यांचे जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.