नेरी : मागील दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली तर नेरी, बोथली, बोडधा, शिरपूर येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असुन मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. परिणामी शेतात शेत पिकांचा ढिगारा जमा करून ठेवलेला असताना गारपीटाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. गार चा आकार मोठा असल्याने अनेकांनी मिळेल त्या भांड्यात गार जमा केल्या.


