Home चंद्रपुर जिल्हा विशेष महीला ग्रामसेविका नावाला ; पतीदेव ग्रामपंचायतीच्या कामाला

महीला ग्रामसेविका नावाला ; पतीदेव ग्रामपंचायतीच्या कामाला

1314
  • कुकडहेटी ग्राम पंचायत मधील लाजिरवाणा प्रकार

सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या कुकडहेटी ग्राम पंचायतीचे नियमबाह्य शिपाई पद भरती प्रकरणं ताजे असताना आता ग्रामसेविकाचे पती देव हेच ग्राम पंचायतीचे कामकाज पाहत असल्याचा खळबळजनक आरोप येथील ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केला असून महिला ग्रामसेविका नावाला आणि पतीदेव ग्रामपंचायतीच्या कामाला अशी म्हणायची वेळ ग्रामपंचायत सदस्यावर आली आहे.

.       ग्राम पंचायत कार्यालयात विनाकारण ग्रामसेविका यांचे पतीला बसण्यास मज्जाव करण्यात यावा. तसेच त्यांचे पती हे कार्यालयीन कामात हस्तक्षेप करीत असल्याने ग्रामसेविका कुमरे यांचेवर शिस्तभंगाची कारवाही करण्यात यावी. अशी मागणी ग्राम पंचायत सदस्यांकडून केली जात आहे.

.       पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत एकूण ५० ग्रामपंचायती कार्यरत असून याकरिता सचिव म्हणून २६ ग्रामसेवक, ग्रामसेविका, मार्फत ग्राम पंचायतीचा कारभार सांभाळला जात आहे. दरम्यान कुकडहेटी ग्राम पंचायत मध्ये सचिव म्हणून पि. व्हि. कुमरे ग्रामसेविका म्हणून कार्यरत असून सदर ग्राम पंचायतीचे सर्व रेकॉर्ड ग्रामसेविका यांचे पती परमानंद मडावी हे ग्राम पंचायत मध्ये बसून स्वतः लिहत असून ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत सुद्धा हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात आला आहे. ग्रामसेविका यांचे पती हे आपल्या पत्नीला ग्राम पंचायत कार्यालयात आणून सोडल्या नंतर ते ग्राम पंचायतीच्या कार्यालयातच बसतात. आणि कार्यालयीन कामाचे दप्तर आपल्या हातात घेऊन स्वतः रेकॉर्ड लिहतात. ग्राम पंचायतीचे प्रोसेडिंग बुक स्वतः पती परमानंद मडावी हे लिहत असतात. तसेच ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत सुद्धा हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्यांनी केला आहे.

.       ग्रामसेविका पि. व्हि. कुमरे यांचे पती यांना विनाकारण कार्यालयात बसण्याचा व कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. असे शासकीय धोरण असताना राजरोसपणे ग्रामसेविका यांचे पती कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचे दिसून येत आहे. महिला ग्रामसेविका नावाला ; आणि पतिदेव मात्र कामाला अशी स्थिती आता कुकडहेटी ग्राम पंचायत मध्ये दिसून येत असल्याने ग्रामसेविका पि. व्हि. कूमरे यांचे पती परमानंद मडावी यांना ग्राम पंचायत कार्यालयात विनाकारण बसण्यास मज्जाव करण्यात यावा. तसेच ग्रामसेविका यांचे पती कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याने ग्रामसेविका यांचेवर शिस्तभंगाची कारवाही करण्यात यावी. अशी मागणी माध्यमातून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!