Home चंद्रपुर जिल्हा विशेष अवैध वृक्ष कत्तल प्रकरणी वनविभागाची शेतकरी व कंत्राटदारावर कारवाई मात्र अधिकाऱ्याला अभय

अवैध वृक्ष कत्तल प्रकरणी वनविभागाची शेतकरी व कंत्राटदारावर कारवाई मात्र अधिकाऱ्याला अभय

1247
  • वनविभागाचे दुप्पटी धोरण 

नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी जवळील तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत नेरी क्षेत्रातील  सावरगाव, कारघाटा, चिखलापार, खरकाडा शेतशिवरातील नाल्यातील व मुख्य मार्गावरील आंबे, साग, आजन नीम आदी सह इतर अनेक झाडाची वनविभागाच्या नियमांना बगल देत एक महिन्यापासून कंत्राटदाराकडून झाडांची कापणी केली जात आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी आणि वनविभागाच्या कोणत्या अधिकाऱ्याची कंत्राटदारा सोबत साठगाठ आहे.

.       याची सखोल चौकशी करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी प्रहार सेवक प्रवीण वाघे यांनी वनविभागाच्या उपवनसंरक्षक वनविभाग ब्रम्हपुरी यांच्या कार्यालयात दि 6 मार्चला निवेदन दिले होते. मात्र या प्रकरणात वनविभागाने शेतकरी व कंत्राटदारावर कारवाई चा बडगा उभारण्यात आल्याचे दिसते पण शेतकऱ्यांचे खसरे व इतर कागदपत्रे सादर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली नसल्याने वनविभागाच्या दुप्पटी धोरणाची नागरिकांत चर्चेला उधाण आले असून अधिकाऱ्यावर कारवाई होणार काय ? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

.     सदर कत्तल प्रकरणी शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली असे वनविभागाचे अधिकारी सांगीत आहेत मात्र सदर 200 ते 300 वृक्ष हे शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर नाहीत अशी माहिती मिळाली तेव्हा शेतकऱ्यांवर कारवाई कशी झाली असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे ? तसेच सदर सर्व वृक्ष हे राखीव जागेतील नाल्यातील व काठावरील आहेत ते सर्व राखीव आहेत आणि त्यांना तोडण्याची परवानगी कशी दिली आणि शेतकऱ्यांची ती मालकीची वृक्षच नाहीत तर  शेतकऱ्यांवर कुठल्या कारणांनी गुन्हा दाखल करण्यात आला हा सर्व वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा गौडबंगाल दिसत असून आपल्या सहकारी अधिकाऱ्याची पाठराखण तर करीत नाहीना असे नागरिकांत चर्चा आहे.

.    शेतकऱ्यांवर नाहक गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित वन अधिकाऱ्याला अभय देण्यात येत असल्याचा प्रकार दिसून येत आहे तेव्हा या वृक्षाच्या कत्तल प्रकरणी वनविभागाचे वरीष्ठ अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करून छडा लावतील का?आणि या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करतील काय ? याकडे संपुर्ण जनतेचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!