- अंतिम सामन्यात आयएमए चंद्रपूरचा केला पराभव
वरोरा : शिवसेना जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने येथील आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सीएम चषक पुरुषांचे टेनिस बॉल क्रिकेट सामने दि. २ फेब्रुवारी पासून आयोजित करण्यात आले होते. ३५ वर्षांवरील प्रौढांकरता आयोजित या स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या आज रविवार दिनांक १० मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात तालुका क्रीडा संकुल वरोरा संघाने आयएमए चंद्रपूरचा पराभव करून सलग दुसऱ्या वर्षी विजय मिळवला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य गाव पातळीवर पोहोचवण्याच्या हेतूने शिवसेना जिल्हा शाखा चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी सीएम चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर केले आहे. ३५ वर्षांवरील पुरुषांकरिता आयोजित ही स्पर्धा दिनांक २ मार्चपासून सुरू झाली होती.
. या स्पर्धेचा अंतिम सामना अंतिम लढत आज रविवार दिनांक १० मार्च रोजी वरोरा तालुका क्रीडा संकुल संघ आणि चंद्रपूर यांच्यात झाली. या लढतीत आय एम ए चंद्रपूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. परंतु त्यांना नेहमीप्रमाणे खेळातील सातत्य टिकवून ठेवता आले नाही आणि १२ षटकात केवळ ७९ धावा हा संघ करू शकला. ८० धावांचे लक्ष घेऊन उतरलेल्या तालुका क्रीडा संकुल संघाने हे लक्ष अवघ्या सात षटकात गाठले आणि विजयश्री खेचून नेली. या संघाच्या आशिष जोगीने आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्याला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, तसेच बेट्स बॉलर आणि बॅट्समन या पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील जलद केवळ १४ चेंडूत५० धावा काढणाऱ्या नितीन मत्ते यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर मनीषा कायंदे यांनी सदर स्पर्धा आयोजित करण्यासाठी नितीन मत्ते यांचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.
. अंतिम लढतीत विजय ठरलेल्या वरोरा तालुका क्रीडा संकुल संघाला शिवसेनेच्या महिला आघाडी सचिव तथा विधान परिषद सदस्य डॉक्टर मनीषा कायंदे, चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख दत्तात्रय पैतवार यांच्या हस्ते ३१००० रुपये रोख व स्वर्गीय सुमनताई नांदुरकर यांच्या यांच्या स्मृती प्रित्यर्थ विनोद नंदुरकर यांच्याकडून प्राप्त झालेले स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर द्वितीय क्रमांकावर राहिलेल्या आयएमए चंद्रपूर संघाला २१००० रुपये रोख आणि हरिनारायण पोटे यांच्याकडून प्राप्त झालेले स्मृतिचिन्ह बहाल करण्यात आले. आनंदवन चे सचिव डॉक्टर विकास आमटे यांनी लिहिलेले आनंदवन प्रयोगवन हे पुस्तक डॉक्टर मनीषा कायंदे व उपस्थित प्रमुख अतिथींना भेट देण्यात आले.
. यावेळी चंद्रपूर येथील भरत गुप्ता, भद्रावती येथील कमलाकांत कळस्कर, कल्पना भुसारी, श्रीकांत खंगार, वरोरा येथील मोनू चिमुरकर, हरिनारायण पोटे, आशिष ठेंगणे, रवींद्र शिंदे, राजू राजुर्ले, देवानंद गावंडे, ॲड मधुकर फुलझेले, डॉ. हेमंत खापणे, डॉ. राकेश पिंपळकर, दारूबंदी निरीक्षक विकास थोरात, विनोद नंदुरकर, समीर बारई, राजेश डांगे, चेतन लुतडे उपस्थित होते.


