Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारपूरच्या गोल पुलाजवळ युवकांचे आंदोलन

बल्लारपूरच्या गोल पुलाजवळ युवकांचे आंदोलन

1182
  • बेशरमांचे झाडे लावून केला निषेध
  • युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

विसापूर : रेल्वे प्रशासनाने बल्लारपूर शहराला जोडणाऱ्या गोल पुलाजवळ तिसऱ्या व चौथ्या रेल्वे रुळाचे काम सुरु केले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकारणच्या पाणी पुरवठा पाईप लाईनला क्षती झाली. त्यामुळे शहरातील नळयोजनेचा पाणी पुरवठा प्रभावित झाला. मात्र संबंधीत कंत्राटदाराने गोल पुलातील काम अर्धवट केले. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याची झळ वाहन चालकांना बसत आहे. यावर मार्ग काढण्यात यावा म्हणून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बेशरमांचे झाडे लावून निषेध आंदोलन केले.

.       बल्लारपूर येथील महाराष्ट्र युवक काँग्रेस चे महासचिव चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात रविवारी हे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोल पुलाजवळ बेशरमांचे झाडे लावून निषेध केला. नागरिकांची व वाहन चालकांची अडचण दूर करून रस्ता पूर्ववत करावा, अशी त्यांनी मागणी केली.

.       यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी शफक शेख, शंकर महाकाली, जुनेद सिद्दीकी, रुपेश भोयर, दानिश शेख, प्रांजल बालपांडे, आकाश दुर्गे, करण कामटे, विवेक कुटमाते, आफ्ताब पठाण, कैलाश धानोरकर, सुनील मोतीलाल, गोपाल कळवाला, राजा केशकर, संतोष बारसागडे, रोहित पठाण, सोनू आमटे, शंकर गड्डमवार, श्रीकांत गुजरकर, सलीम शेख आदींची उपस्तिथी होती.

error: Content is protected !!