Home सामाजिक निपुणोत्सव उपक्रमाअंतर्गत आसन खु. शाळेत माझी पोषण थाळी उपक्रम

निपुणोत्सव उपक्रमाअंतर्गत आसन खु. शाळेत माझी पोषण थाळी उपक्रम

1227

 महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

गडचांदूर : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसन खुर्द येथे निपुणोत्सव उपक्रमांतर्गत माझी पोषण थाळी हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश मुरकुटे,उपाध्यक्ष वनिता पायघन, तंटा मुक्त समितीचे सदस्य सुरेश पेंदोर, महादेव पेंदोर, अशोक धाबेकर, सुवर्णा कुमरे, सदस्य प्रियंका पेटकर, सुनिता आडे व गावातील महिला, पालक, विद्यार्थी सहभागी झाले होते.

.       माझी पोषण थाळी तसेच निपुणोत्सव उपक्रमाबद्दल शाळेचे शिक्षक तुकाराम धंदरे यांनी माहिती सांगितली. त्याचप्रमाणे मंगला बावणे अंगणवाडी शिक्षिका यांनी पोषणाचे महत्त्व सांगितले. सदर उपक्रमात एकूण 18 महिलांनी सहभाग नोंदवत आपल्या पोषण थाळी प्रदर्शनात मांडण्यात आल्या. परिक्षकामार्फत 2 टीम ने परीक्षण करून उत्कृष्ट पोषण थाळीला प्रथम क्रमांक प्रणाली पायघन, व्दितीय क्रमांक लक्ष्मी गुरम व तृतीय क्रमांक निता वडस्कर यांना देण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम पाचभाई, शिक्षक मारोती सोयाम यांनी उत्तम नियोजन करून माझी पोषण थाळी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

error: Content is protected !!