Home चंद्रपुर जिल्हा विशेष साहेब, उत्सव पुरे झाले, आता जनतेची कामे करा

साहेब, उत्सव पुरे झाले, आता जनतेची कामे करा

1207

अधिकारी उत्सवात मस्त, नागरिक त्रस्त

माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

चंद्रपूर :  जिल्ह्यातील नेत्यांमध्ये स्पर्धा व उत्सव घेण्याची होड लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून ते थेट चपराशापर्यंत सारेच्या सारे शासकीय अधिकारी-कर्मचारी मागील अनेक महिन्यांपासून उत्सव व स्पर्धांचे आयोजन करण्यात गुंतले आहेत. उत्सवांच्या आयोजनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेची कामे करायला वेळ मिळत नाही. परिणामी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील अनेक समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले. यावर जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आज दि.1 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना खरमरीत पत्र लिहिले. ‘उत्सव पुरे झाले आता जनतेची कामे करायला अधिक वेळ दिला पाहिजे’, अशी भूमिका देशमुख यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी 1 मार्च रोजी सकाळी 11 वाजेदरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा यांची प्रत्यक्ष भेटून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

.       जनतेच्या मनोरंजनाच्या नावाखाली उत्सव व क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा अतिरेक होत आहे. चंद्रपूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित विविध स्पर्धा व उत्सव यावर अनेक कोटी रूपयांची उधळपट्टी होऊन राहिली. लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने शासकीय अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात करोडो रुपयांची लूट करीत आहेत. विविध उत्सव आणि स्पर्धांचे आयोजन करून जनतेच्या डोळायात धूळ फेकण्याचा, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी करित आहेत, असा आरोप सुद्धा देशमुख यांनी केला.

error: Content is protected !!