Home चंद्रपुर जिल्हा विशेष विसापूर ग्रामपंचायतवर शेतकऱ्यांचा हल्लाबोल

विसापूर ग्रामपंचायतवर शेतकऱ्यांचा हल्लाबोल

1182

भूमिगत कोळसा खाण परवानगी प्रकरण

मासिक सभेत केला ठराव पारीत

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीने बुधवारी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सन फ्लग आयर्न अँड स्टील कंपनीला भूमिगत कोळसा खाणीला परवानगी देण्याचा ठराव पारित केला. या मुळे गावातील काही निवडक शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला. त्यांनी आज गुरुवारी विसापूर ग्रामपंचायतवर मोर्चा काढून निवेदन दिले. त्यावेळी उपस्थिती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही,अशी भूमिका घेऊन मार्ग काढला.

.        बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाच्या हद्दीत भिवकुंड कोल ब्लॉक केंद्र सरकारच्या कोल मंत्रालयाने मंजूर केला. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार हा कोल ब्लॉक सन फ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीने कोळसा खाण सुरु करण्यासंदर्भात भूमितगत कोळसा खाणीसाठी विसापूर ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्राची अर्जद्वारे मासिक सभेचा ठराव मागितला. काल बुधवारच्या मासिक सभेत यावर चर्चा करण्यात आली.

.        ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत उपस्थितीत १५ सदस्यांपैकि 13 जणांनी सन फ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या भूमिगत कोळसा खानीला मंजुरी प्रदान केली.यातील दोन सदस्यांनी कोळसा खानीला विरोध केला. यामुळे गावातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी समितीच्या पदाधिकाऱ्यात असंतोष निर्माण झाला. शेतकऱ्यांना न विचारता तुम्ही ग्रामपंचायतीचा ठराव का पारित केला, म्हणून आज गुरुवारी ग्रामपंचायतीवर हल्लाबोल करून पदाधिकाऱ्यांना वेठीस धरले. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न गावात निर्माण होऊ, नये म्हणून बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, उपनिरक्षक गोविंद चाटे पोलीस पथक घेऊन आले. त्यांनी आंदोलक शेतकरी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात चर्चा करून मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांनी शेतीची जमीन सन फ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीला देऊ नये, शेतकऱ्यांनी जमीन दिलीच नाही. तर गावात भूमिगत कोळसा खाण सुरु होणार नाही. त्यामुळे त्या कंपनीला कोणतीच परवानगी लागणार नाही. असे असेल तर आम्ही ठराव मागे घेणार म्हणून आश्वासन दिले.

“आमच्या ग्रामपंचायतीला सन फ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीचे पत्र आले.त्या पत्रावर मासिक सभेत चर्चा झाली. 13 ग्रामपंचायत सदस्यांनी भूमिगत कोळसा खानीला परवानगी द्यावी, म्हणून संमती दिली. यातील दोघांनी विरोध केला. त्याचे मत ठरावात नुमुद केले आहे. आम्ही मासिक सभेत ठराव पारित केला. कोळसा खाण शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर होत आहे. शेतकऱ्यांनी शेत जमीन देऊ नये. शेतकऱ्यांसह अन्य गावाकऱ्यांनाचा आम्हांला विचार करून निर्णय घ्यावा लागतो. गावात उद्योग आला पाहिजे. बेरोजगारांना काम मिळाले पाहिजे. याचा फायदा शेतकऱ्यांनाही झाला पाहिजे. आम्ही सन फ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या भूमिगत कोळसा खानीला परवानगी देण्याबाबत ठराव केला आहे. अद्याप दिला नाही.                                                                                                                                                                                                                                                      वर्षा कुळमेथे, सरपंच ग्रामपंचायत विसापूर.

“आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देत आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय होने, आवश्यक आहे. आमची पोटाची भाकर ग्रामपंचायत कशी हिरावू शकते. ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी ठराव पारित केला. त्यांनी शेतकऱ्यासमक्ष भूमिका व्यक्त करण्यास आम्ही बाध्य केले. त्यांचे कडून आम्ही लिखित आश्वासन घेतले आहे. आमचे आंदोलन यशस्वी झाले.                                                                                                                                                                                                                         बंडू गिरडकर, माजी सरपंच विसापूर.

error: Content is protected !!