Home सामाजिक प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे 2 लाख रुपये वारसदारांना सुपूर्द

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे 2 लाख रुपये वारसदारांना सुपूर्द

1301

फक्त 330 रुपयांत 2 लाखांचे विमा संरक्षण! 

विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचा 12 वा वर्धापन दिनी धनादेश वितरित

चंद्रपुर : कधी कोणाला काय होईल आणि कोण कधी सोडून जाईल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाची भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक झाले आहे. धानोली येथील एका युवकाच्या वारसदाराला  केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळाल्याने विमाधारकाच्या  वारसदाराला विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचा 12 वा वर्धापन दिनी 2 लाख रुपयांचा धनादेश विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापकाच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

.          नंदोरी येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँक येथे धानोली येथील शेतकरी सोनूल निळकंठ बोढे या युवकाने ऑगस्ट 2021 मध्ये  केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा 330 रुपयाचा विमा काढला होता. त्यानंतर काही दिवसानंतर सोनुल ची प्रकृती बिघडली. त्याचा आजार वाढतच गेला. आणि त्या आजाराने त्याचा सन 2022 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकाला माहिती दिली. सोनुल ने मृत्युच्या अगोदर विदर्भ कोंकण ग्रामीण शाखा नंदोरी येथे  काढलेल्या विम्याची बँके कडून कागदपत्राची पूर्तता करण्यात आली. आणि बँकेच्या वर्धापन दिना निमित्य प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत मृत्यकाचे वारसदार त्याची पत्नी  स्वाती सोनूल बोढे यांना बुधवारी शाखा व्यवस्थापक गिरीश पेंदोर यांच्या हस्ते 2 लाख रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.

.         धनादेश सुपूर्द करताना रोखपाल पंपानवर, अमीर बोढे, अमोल टोंगे, व बँक सखी मनीषा मेश्राम उपस्थित होत्या.

error: Content is protected !!