Home चंद्रपुर जिल्हा विशेष ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी धान उत्पादक शेतकरी चिंतेत

ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी धान उत्पादक शेतकरी चिंतेत

1201

 सिंदेवाही तालुक्यात धान पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव 

सिंदेवाही : यावर्षी खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी निराश झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकांवर पल्लवित झाल्या असताना मागील काही दिवसापूर्वी सिंदेवाही तालुक्यात गारपीट व पावसाने झोडपले. आणि लाक, तुर, हरबरा, यासारख्या कडधान्याची प्रचंड नुकसान झाली. तालुक्यात ज्यांचे कडे सिंचनाची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली आहे. धानाचे पीक जोमात असताना मागील आठवड्याभरा पासून ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी धानावर खोड किडा, व अन्य किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक प्रकारच्या कीटकनाशक ची फवारणी करूनही कीड नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे.

.       सिंदेवाही तालुका हा मुख्यत्वे धानाच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात बारीक, आणि सुगंधित तांदळाचे पीक घेतले जाते. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीमध्ये सिंचनाची सोय करून खरीप पिकानंतर रब्बी हंगामात सुद्धा धानाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. सध्या सिंदेवाही या तालुक्याच्या ठिकाणासह नवरगाव, रत्नापूर, मिनघरी, देलनवाडी, अंतरगाव, नाचनभट्टी, उमरवाही, वासेरा, शिवणी, कळमगाव, अशा अनेक गावात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आलेली आहे. धानाचे पीक सध्या डौलात उभे असताना खोड किडा, यासह अनेक रोगराही पसरले आहेत. त्यामुळे शेतकरी मिळेल ते कीटकनाशकं फवारणी करीत असून त्याचा काहीही उपयोग होत नसल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून योग्य मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

.       तालुक्यातील शेतकरी अस्मानी, व सुलतानी संकटाचा सामना करीत अनेक पिकांचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन व कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीच्या शेतमालावर अवलंबून असतो. अशा वेळी उत्पादनात घट होऊन नियोजन कोलमडल्याने हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना पूर, अतिवृष्टी, परतीचा पाऊस, या संकटाना सामोरे जावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. तरीही शेतकरी निराश न होता ज्यांचेकडे सिंचनाची सोय आहे. अशा शेतकऱ्यांनी पुन्हा रब्बी हंगामाची तयारी करून मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली आहे. शिवारातील हिरवेगार पीक पाहून शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या असताना मागील एक आठवड्या पासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने त्याचा फटका धान पिकाला बसला आहे. व धानावर अनेक प्रकारचे रोग पसरले आहेत. शेतकरी मिळेल ती औषधाची फवारणी करीत असून रोगराही नियंत्रणात येत नसल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!