विद्यार्थ्यांची मागणी
वरोरा : शहरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे तहसील समोरील मुख्य मार्गावर गतिरोधक लावण्याची मागणी समोर आली आहे. जाजू चौक ते रेल्वे स्टेशन चौक रस्ता झाल्यापासून शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत अनेक तक्रारी देऊनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वरोराकर करीत आहेत. सध्या १२ व्या वर्गाचे पेपर सुरू असून निकाल लागल्या नंतर विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र काढण्याची वर्दळ तहसीलमध्ये होईल हे मात्र नक्की यामुळे निश्चितच रस्त्यावरील रहदारी व गर्दीचे प्रमाण वाढणार आहे.
. गतिरोधक नसल्याने भरधाव वेगाने वाहणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मुख्य रस्त्यावर योग्य ठिक-ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे असे अनेक अपघात घडले आहेत. या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर तातडीने गतिरोधक बनविण्यात यावे. वाहनांची गती नियंत्रणात आणण्यासाठी या उपाययोजना आवश्यक आहेत. त्यामुळे यावर तातडीने अंमल व्हावा अशी मागणी तहसील मध्ये येणारी जनता करीत आहे.


