Home चंद्रपुर जिल्हा विशेष खांबडा येथे अवैध रेती तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

खांबडा येथे अवैध रेती तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

1219

 महिला एसडीपीओ अधिकाऱ्याची रेती माफियावर करडीनजर 

वरोरा : तालुक्यातील खांबाडा येथील पोत्रा नदिघाटातून गेल्या काही महिन्यांपासून अवैध रेती तस्करी केल्या जात असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने धाड टाकीत दोन ट्रॅक्टर जप्त करीत ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

.         वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील पोत्रा नदिघाटातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती ची तस्करी केली जात असल्याची माहिती नुकत्याच रुजू झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी नओमी साटम यांना माहिती होताच पथक तयार करून खांबडा येथील पोतरा नदी घाटातून अवैधरीत्या रीती तस्करी करताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 ए पी 1807 व विना नंबरची ट्रॉली, ट्रॅक्टर क्रमांक एम एच 32 ए एच 0422,ट्रॉली क्रमांक एम एच 40 ए 6340 या दोन ट्रॅक्टरवर अवैध रेती तस्करी करताना कार्यवाही केली आहे. यामध्ये एकूण 8 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये आकाश उईक बारवा, कपिल ढेकणे खांबडा आणि वसंता बावणे खांबडा या 3 आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसून कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे.

.         मात्र अवैध मार्गाने कमावलेल्या पैशाची चौकशी करून आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणी जन्सामान्यातून होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन थातुर मातुर कार्यवाही करून आरोपींना आश्रय देते की शासनाचा बुडालेला करोडो रुपयांचा महसूल जप्त करते हे बघणे औचीत्याचे ठरणार आहे. सदरची कार्यवाही पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी नाओमी साटम व पोलीस निरीक्षण अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव,पोलीस हवालदार दिलीप सुर, शशांक बदामवार, नितीन तुरारे, महेश गाऊत्रे यांनी पार पडली असून पोलीस तपास वरोरा पोलीस करत आहे.

error: Content is protected !!