वनपरिक्षेत्र वरोरा, उपक्षेत्र टेंभुर्डा, नियतक्षेत्र महालगाव खुर्द वनखंड क्र 2 संपूर्ण वनक्षेत्र मिश्र प्रजातीच्या झाडांनी व्याप्त असुन सर्वाधिक पळस प्रजाती दिसून येते. वनरक्षक स. वि. वेदांती आणि महालगाव PRT टिम गस्त करीत असताना त्यांना दुर्मिळ पिवळा पळस आढळुन आला. आर्युवेदात पिवळ्या पळसाला खुप महत्व असल्याने दुर्मिळ असलेल्या पळसाला जोपासना करणे काळाची गरज आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा सतिश शेन्डे यांचे मार्गदर्शनात सदर पळसाची निघा राखने व त्याची जोपासना करण्याबाबत उपाययोजना ठरविण्यात आले. क्षेत्र सहायक टेंभुर्डा व वपअ वरोरा शेंडे यांनी महालगाव रोपवाटिका मध्ये सदर पिवळ्या पळसाची रोपे तयार करून लागवडीकरीता सर्वत्र वाटप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. या वर्षी 300 झाडे तयार करून लावण्यात येईल असे वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले.
(छायाचित्र : किशोर डुकरे, वरोरा)


