पकडलेले ट्रॅक्टर महसूल विभागाच्या स्वाधीन
नेरी : चिमूर तालुक्यातील उसेगाव येथील उमा नदीच्या घाटावर रेती तस्करांनी चांगलाच धूळघुस घातला होता. याबाबत तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अखेर उसेगाव येथील नागरिकांनी रात्रभर जागून मध्यरात्री (दि 22) रेतीची तस्करी करणाऱ्या नेरी येथील रेती तस्कराला ट्रॅक्टर सहित रंगेहात पकडून महसूल विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
. चिमूर तालुक्यात रेतीची तस्करी करणार्यांना सुगीचे दिवस आले आहे. दिवसरात्र रेतीची तस्करी सुरू आहे. मात्र महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. महसुल विभागाला अनेकदा माहिती देऊनही कोणताही अधिकारी तस्कराना अडवत नसल्याने उसेगाव वाशियानी रेतीची तस्करी रोखण्यासाठी स्वता रात्र जागून नेरी येथील यामेश पिसे यांचे ट्रॅकटर रेतीसाहित नदीपात्रात पकडले आणि ग्रा प कार्यालयाच्या आवारात जमा केले यावेळी नागरीकांनी अनेकदा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वर संपर्क साधला मात्र कुणीही आले नसल्याने गावकऱ्यांत त्यांच्या विरुद्ध रोष निर्माण झाले होते. पहाटे सहा वाजता महसूल अधिकारी गावात दाखल होताच रेती भरलेले ट्रॅक्टर त्यांच्या स्वाधीन केले. यावेळी मंडळ अधिकारी कुंभरे, तलाठी जे. आर. घरकेले, तलाठी कांबळे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.


