मुल : शेतात बकऱ्या चारायला गेलेल्या युवकावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना मुलं तालुक्यातील मरेगावं येथे घडली. आशिष राजू दूधकोवर (17) असे जखमी युवकाचे नाव आहे.
. औधोंगिक विकास महामंडळ आकापूर च्या परिसरातील पृथ्वी कंपनीच्या जवळील विश्वेश्वर कोंडू पेंदोर यांच्या शेतात बकऱ्या चारत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून जखमी केले. आशिषणे आरडाओरड केल्याने बिबट पळून गेला. त्यानंतर जखमी आशिषला उपचारार्थ मुलं येथील उपजिल्हा रुग्णलायात भरती करण्यात आले.
. घटनास्थळावर सावली वनपरीक्षेत्र कार्यालयाचे वनपारिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक धनविजय आणी बाकी कर्मचारी उपस्थित होत पंचनाम्याची कार्यवाही पार पाडली.


