राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते चंद्रपूरात सत्कार
चंद्रपुर जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंना नवचैतन्य
चंद्रपुर : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे अखिल भारतीय हौसी कबड्डी असोसिएशन नवी दिल्ली चे सहसचिव जितु ठाकुर यांच्या हस्ते चंद्रपुर येथील माता महाकाली बहूद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपुर चे अध्यक्ष सचिन साधनकर यांची चंद्रपुर जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीने चंद्रपुर जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंना नवचैतन्य लाभणार असून त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
. सतशील बहूद्देशीय व्यायाम प्रसारक मंडळ चंद्रपुर तथा सन्मित्र क्रीडा मंडळ चंद्रपुर तर्फे आयोजित चंद्रपुर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील पुरूषांचे भव्य खुले कबड्डी सामने दरम्यान माता महाकाली बहूद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपुर चे अध्यक्ष सचिन साधनकर यांची चंद्रपुर जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
. यावेळी माजी उपमहापौर अनिल फुलझले, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेलवार, अमित लडके, विनोद शेरकी, सचिन चाफले, यांची उपस्थिती होती.
युवकांनी मैदानी खेळ खेळावे आजचे युग मोबाईल व इंटरनेटचे आहे. यामाध्यमातून जगातील माहिती क्षणाधार्थ उपलब्ध होत असली, तरी शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी मैदानी खेळ आजही महत्वाचे आहे. मात्र आजघडीला मैदानी खेळाकडे युवकांचे दुर्लक्ष होत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे युवकांनी मैदानी खेळ खेळावे, खेळाडूंना कुठलीही अडचण आल्यास त्यांना सहकार्य करू. कबड्डी खेळात चंद्रपुर जिल्ह्याचे नाव देशभरात उंचावेल यासाठी प्रयत्न करणार आहोत. सचिन साधनकर, नवनियुक्त अध्यक्ष, कबड्डी जिल्हा असोसिएशन चंद्रपुर


