Home चंद्रपुर जिल्हा विशेष गॅसच्या दुकानात सिलेंडरच्या स्फोटाने आग

गॅसच्या दुकानात सिलेंडरच्या स्फोटाने आग

1358

बल्लारपूरातील रेल्वे चौकातील घटना

आगीत दुकान झाले भस्मसात

विसापूर : बल्लारपूर शहरातील बल्लारपूर – आलापल्ली मार्गावर गजबजलेल्या रेल्वे चौकात एका दुकानात सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरचा स्फोट होताच अक्खे दुकान आगीच्या भक्षस्थानी आले. यामुळे दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान बल्लारपूर येथील रेल्वे चौकात घडली.

.        बल्लारपूर – आलापल्ली मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. येथील रेल्वे चौकात दिगवा यांचे गॅस शेगडी दुरुस्तीचे दुकान आहे. याच दुकानात अचानक दोन गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटाने दुकान आगीच्या कवेत आले. याची झळ बाजूच्या दुकानाला बसण्याची शक्यक्ता निर्माण झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच वेळी बल्लारपूर नगरपालिका व पेपर मिलचे अग्निशमन दलाचे पथक बोलविण्यात आले.
अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र आगीचा भडका मोठा असल्याने आग आटोक्यात येणास अडचण निर्माण होत होती. वृत्त लिहिण्यापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु होते. गजबजलेल्या दुकान चाळीत सिलिंडरच्या स्फोटाने आग लागल्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले.आगीमुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!