५६४४ शेतकर्यांची यादी वरोरा तहसील कार्यालयाला प्राप्त
४९५१ शेतकऱ्यांची नावे यशस्वी रित्या पोर्टल वर अपलोड
शेतकर्यांना केवायसी करण्याचे आवाहन
वरोरा : जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शासकीय अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर काही अनुदान शेतकर्यांच्या केवायसी मुळे रखडले आहे. ५६४४ शेतकर्यांची यादी वरोरा तहसील कार्यालयाला प्राप्त झाली असून ४९५१ शेतकऱ्यांची नावे यशस्वी रित्या पोर्टल वर अपलोड झाली आहे तर त्यातील ३०८० शेतकऱ्यांची नावांची यादी ई केवायसी करिता उपलब्ध झाली असल्याची माहिती आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी केवायसी करणे आवश्यक असून ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसल्यास त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शेतकर्यांनी तात्काळ सेतु केंद्रात जाऊन केवायसी पूर्ण करावी असे आवाहन तहसील कार्यालय वरोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
. प्राप्त माहितीनुसार माहे जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत वरोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा गावाचे पंचासमक्ष ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांचे संयुक्त पथकाद्वारे पूर्ण करून 5644 नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची नावे वरोरा तहसील कार्यालयास प्राप्त झाली आहेत.
. या 5644 शेतकरी यांची यादी शासन स्तरावर ई पंचनामा पोर्टल द्वारे पाठविण्याचे काम तहसील स्तरावर सुरू आहे. आता पर्यंत एकूण 4951 शेतकऱ्यांची नावे यशस्वी रित्या सदर पोर्टल वर अपलोड झाली आहे. त्यातील 3080 शेतकऱ्यांची नावांची यादी ई केवायसी करिता उपलब्ध झाली आहे. तरी या यादीतील सर्व 3080 शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर सेतू केंद्रात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. उर्वरित शेतकऱ्यांची नावे येत्या आठ दिवसात पोर्टल वर अपलोड करण्याचे काम तहसील प्रसासानाद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असून लवकरच उर्वरित ई केवायसी यादी आपल्याला उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्यावेळी यादीत नाव येईल, त्यावेळी लाभाथ्यांना मिळणा-या शासकीय अनुदानाकरिता तलाठी स्तरावर मिळणारे विशिष्ट क्रमांक टाकूनच स्वतःचे बँक खाते केवायसी करावे लागणार आहे, अन्यथा शासनाच्या सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आपले आधार प्रामाणिकरण करने गरजेचे आहे. आधार प्रामाणिकरण झाल्यानंतर काही तासातच अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

