Home सामाजिक रोजगाराच्या शोधात तरुणाईच्या कलागुणांना मिळणार वाव

रोजगाराच्या शोधात तरुणाईच्या कलागुणांना मिळणार वाव

1130

 सण आणि जयंती उत्सव साठी परिवर्तन ढोल ताशा पथक सज्ज 

सिंदेवाही : दसरा असो की दिवाळी, जयंती असो की, पुण्यतिथी. सण,उत्सव साजरे करीत असताना डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचण्यात तरुणाई पुढे सरसावली आहे. अशातच तरुणाईच्या हाताला कोणतेही काम नसल्याने रोजगाराच्या शोधात सिंदेवाही येथील तरुण तरुणींनी आपल्या कलागुणातून रोजगार निर्मितीचे काम केले असून नुकतेच परिवर्तन ढोल ताशा पथक तयार करून प्रात्यक्षिक दाखवत मान्यवरांच्या हस्ते आपल्या ढोल ताशा पथकाचे उदघाटन केले आहे.

.       सिंदेवाही शहरातील काही युवक युवती एकत्र येत परिवर्तन ढोल ताशा पथक तयार केले आहे. नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार सिंदेवाही यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त परिवर्तन ढोलताशा पथकाचा उदघाटन समारंभ डॉ. आंबेडकर चौक येथे आयोजित करून तरुण तरुणींनी सजविलेला परिवर्तन ढोलताशा पथकानी प्रात्यक्षिक करून दाखविले आहे.

.       आतापर्यंत पुणे , मुंबई , नागपूर येथील ढोल ताशांचे पथके असल्याचे नेहमीच दिसत आहेत. मात्र आता ग्रामीण भागातील सिंदेवाही येथील तरुणाई ढोल ताशा पथकासाठी सज्ज झालेली आहे. या परिवर्तन ढोल ताशा पथक मध्ये एकूण ३० युवक युवती असून यामध्ये २० युवक आणि १० युवती यांचा समावेश आहे. या परिवर्तन पथकासाठी ढोल, ताशे व लागणारे सर्व विविध प्रकारचे सजावटीचे संपूर्ण साहित्य युवकांनी खरेदी केले आहेत. पथकाचे संचालन, सराव नियमित करीत असून दररोज सकाळी आणि सायंकाळी गावाच्या बाहेरील भागात दोन तास सराव सुरू केलेला होता.

.       ग्रामीण भागातील तरुणाई रोजगाराचे शोधात इकडे तिकडे फिरत असताना सिंदेवाही येथील तरुण तरुणींनी विविध प्रकारच्या क्षेत्रात कलागुणांना वाव मिळेल याकरिता परिवर्तन ढोल ताशा ध्वज पथक निर्माण केला आहे. वर्षभरामध्ये येणाऱ्या विविध सणांना तसेच महा पुरुषांच्या जयंती उत्सव, शोभायात्रा, मिरवणूक, करीता परिवर्तन ढोलताशा पथक सज्ज झालेली आहे. यामधून तरुण तरुणींची कला दिसणार असून यामधून त्यांना काही प्रमाणात मोबदला सुद्धा मिळणार आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार सिंदेवाही यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच १० फेब्रुवारी रोजी डॉ. आंबेडकर चौक येथे उदघाटन समारंभ आयोजित करून निक्कु भैसारे, यांचे हस्ते ढोल ताशा पथकाचे उदघाटन करण्यात आले.

.       यावेळी डांगे मॅडम, डॉ. विनोद नागदेवते, तेजस डोंगरे, भोजराज सोरदे, नंदू खोब्रागडे, गणेश मेश्राम, नगरसेवक दिलीप रामटेके, गिरी ढवळे, संजय रामटेके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन कुंदन गजभिये, प्रास्ताविक नंदू खोब्रागडे, आभार प्रदर्शन संजय रामटेके यांनी केले.

error: Content is protected !!