Home चंद्रपुर जिल्हा विशेष विचोडा (रै) येथे गाजली महिला ग्रामसभा

विचोडा (रै) येथे गाजली महिला ग्रामसभा

1140

 

बल्लारपुर 

.            ग्रामपंचायत विचोडा (रै) येथे महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सभेत उपस्थिती दर्शवली. या ग्रामसभेत गावच्या सरपंच माधुरी सागोरे, ग्रामसेविका वनिता कोडापे, फेलो मंजू रामटेके, माजी ग्रा.पं.सदस्या अनिता पिंगे, CRP रुंदा पिंगे, ग्रामसंघाच्या अध्यक्षा शालू पिंगे, ग्रामपंचायत सदस्य व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
या महिला सभेत ग्रासरुट लिडरशिप कार्यक्रमाचे फेलो मंजू रामटेके व महिलांनी मिळून महिलांचे घरटॅक्स पावतीवर नाव आहे परंतु घरासमोर पती-पत्नी दोघांचेही नाव असलेली नेम प्लेट संपूर्ण गावांमध्ये लावून देण्यात यावे. गावामध्ये शंभर टक्के विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात यावे जेणेकरून महिलांना आधार कार्ड काढण्यास, पतीच्या मृत्यूपच्यात मालकी हक्क मिळवण्यासाठी समस्या येऊ नये, शेतीच्या सातबारावर नाव चढवण्यासाठी महिलांना समस्या येऊ नये अशी मागणी केली.
विचोडा (रै) गावातील महिलासाठी तिळगूळ व हळदी कुंकवाचा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात यावा. ग्रामसभेबाबत गावांमध्ये नोटिसा लावण्यात यावे जेणेकरून लोकांना ग्रामसभेची माहिती होईल व महिलांची उपस्थिती वाढेल इत्यादी मागण्या महिलाद्वारा ग्रामसभेमध्ये करण्यात आल्या. ही ग्रामसभा उत्स्फूर्तपणे महिलांच्या उपस्थितीत यशस्वी झाली. यावेळी मागण्या पूर्ण करण्याचे सकारात्मक आश्वासन ग्रामपंचायत द्वारा देण्यात आले.

error: Content is protected !!