वरोरा
. चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे काल वरोरा ,भद्रावती तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतमालांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतमालांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
![]()
. शनिवारी संध्याकाळी वरोरा, भद्रावती तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि गारपीट झाल्यानें शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या आधी नुकसान झालेल्या शेतमालाची देखिल नुकसानीची मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. यावर यावर आणखी भर पडली असून गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याचे तात्काळ पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी प्रतिभाताई धानोकर यांनी केली आहे. कधी सततची नापिकी तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरी कडे शासन शेतकऱ्यांना दुर्लक्षित करुन राहिले आहे. शेतकरी खचून जाऊ नये ही शासनाने जबाबदारी घ्यावी अशी मागणी देखील आमदार प्रतिभा धनोरकर यानी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करुन तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पंचनामे करण्याच्या सूचना देखील केल्या आहे.


