Home चंद्रपुर जिल्हा विशेष ओबीसी जणगणनेचा लढा निर्धाराने लढा

ओबीसी जणगणनेचा लढा निर्धाराने लढा

1180

विसापुरात ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचा संदेश

ओबीसींच्या संकल्प यात्रेचे जलौशात स्वागत

विसापूर : राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा घाट घातला आहे. यासाठी अधिसूचना देखील काढली आहे. यामुळे ओबीसी जणगणनेचा मुद्या ऐर्णीवर आला आहे.ओबीसींचे घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासाठी ओबीसी जणगणनेचा आपण सर्वांनी संकल्प करण्याची गरज आहे. ओबीसी जणगणनेचा लढा निर्धाराने लढण्याची नितांत गरज आहे, असा निर्धार विसापूर येथील सभेत ओबीसी जनगणना संकल्प यात्रेतील मान्यवरांनी केला.

.           ओबीसी युवा अधिकार मंच व संघर्ष वाहिनीच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील महात्मा गांधी बापू कुटी सेवाग्राम येथून 3 फेब्रुवारी पासून ओबीसी जनगणना संकल्प यात्रा जनजागृती करण्यासाठी निघाली आहे. ही यात्रा शुक्रवारी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे दाखल झाली. यावेळी येथील ओबीसी बांधवासह सामाजिक कार्यकर्त्यांनी जलौशात स्वागत करण्यात आले. यावेळी मोटार सायकल मिरवणुकीच्या माध्यमातून मुख्य मार्गानी मार्गक्रमण करत ओबीसी जनगणना संकल्प व जनजागृती यात्रा महापुरुष व संताच्या पुतळ्यांना मालार्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली. यावेळी जाहीर सभा घेण्यात आली.

.           सभेत ओबीसी जनगणना संकल्प व जनजागृती यात्रेचे सारथी उमेश कोराम,अनिल डहाके,अड.पुरुषोत्तम सातपुते,विसापूरचे माजी सरपंच बंडू गिरडकर यांनी मार्गदर्शन करून ओबीसी जणगणनेचा लढा निर्धाराने लढण्याच्या संकल्प करण्याचे आवाहन केले.

.           यावेळी मंचावर प्रा.सुरेश विधाते, शंकर पाल, विसापूर येथील माजी जि. प.सदस्य रामभाऊ टोंगे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रा.पं.सदस्य प्रदीप गेडाम, नरेंद्र इटनकर, संजय वानखेडे, राजू लांडगे, विनायक काळे, गणेश टोंगे, चंद्रकांत पावडे, सुभाष भटवलकर, सुरेश पंदिलवार यांची उपस्थिती होती.

.           दरम्यान ओबीसी जनगणना संकल्प यात्रेच्या संयोजकांनी जातिनिहाय जनगणना महत्वाची असून राज्यात ओबीसींचा टक्का किती आहे. शासनस्तरावर ओबीसींचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी राज्यकर्ते काय योजना ठरवित आहे. ओबीसींचे राजकीय हक्क का हिरवण्यात येत आहे, याची आकडेवारी केवळ ओबीसींची जातनिहाय जनगणना केल्यावरच स्पष्ट होणार आहे. यामुळे ओबीसींनी जातनिहाय जणगणनेचा लढा देण्यासाठी संघर्ष करावा, असे सांगितले.

.           ओबीसींची जातनिहाय जनगणना संकल्प यात्रेच्या सारथ्याचि रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था विसापूरकरांनी येथील धनोजे कुणबी समाज सभागृहात केली.कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत पावडे यांनी केले,तर आभार सुरेश पंदिलवार यांनी मानले.यावेळी ओबीसींच्या घटकातील जनमान्य नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येनी होती.

error: Content is protected !!