उथळ झालेल्या तलावाचे खोलीकरण करा

433

संजय गांधी निराधार योजने चे अध्यक्ष विजय वानखेडे यांची मागणी

भद्रावती : भद्रावती तालुक्याची ओळख ही ऐतिहासिक तिर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे तसेच तलावासाठी सुध्दा वेगळी ओळख आहे.या तालुक्यात 29 मा. मा. तलावांची रेकार्ड नुसार नोंद आहे.

.           शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी यासाठी मध्य वैनगंगा उप खो-यातील गोडंकालीन राजवटीत पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात हजारो तलाव बांधण्यात आले होते. ब्रिटिशांनी महसूल गोळा करण्याची पध्दती प्रस्थापित करण्यासाठी हे तलाव मालगुजाराकडे हस्तांतरित केले. स्वातंत्र्यानंतर या तलावांची नोंद ” माजी मालगुजारी ” अशी करण्यांत आली. सध्या स्थित पाचही जिल्ह्यातील 6 हजार 832 तलाव सुरक्षित आहे.स.गो.बर्वे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र सिंचन आयोगाने मामा तलावांची उपयोगिता स्पष्ट करून सुस्थितीत असलेला प्रत्येक तलाव किती हेक्टर क्षेत्रात सिंचन करु शकतात हे देखील जाहीर केले आहे.

.           मागील कित्येक वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील तलावांची दुरुस्ती न झाल्यामुळे ते उथळ होवून तलावांची पाणी साठवण्याची क्षमता घटली आहे. या वर्षाच्या उन्हाळ्यात 29 तलावांची दुरुस्ती करून त्याला खोलीकरण करण्याची मागणी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे सांगितले. भद्रावती तालुका हा विदर्भात शिगांड्यासाठी प्रसिद्ध असून येथील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात शिंगाड्याचे उत्पन्न घेतात तसेच या तलावाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसाय करतात. इतक्या मोठ्या प्रमाणात तलावांची संख्या असणारे एकमेव तालुका म्हणून भद्रावती ची एक ओळख आहे. या तलावांना खोलीकरण केल्यास भुर्गभातील पाण्याची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढू शकेल आणि शिंगाड्याची शेती व मत्स्यशेती व मत्स्यव्यवसाय पुन्हा भरभराटीस येवून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी मदत होईल असे मत व्यक्त केले.

.           मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून हे 29 तलाव सर्वच शासकीय यंत्रणेनेच्या विकासापासून दुर्लक्षित झाल्याचे दिसते आणि म्हणून भद्रावती शहरांची व तालुक्यांची पाण्याची पातळी सुध्दा खालावली जात आहे. भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोळशाच्या खाणी असल्याने तिथून जो पाण्याचा उपसा होतो त्यामुळे या भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई उद्भवतांना दिसते आणि म्हणून या सर्वाला पर्याय म्हणून या उथळ झालेल्या तलावाचे खोलीकरण करणे अंत्यंत आवश्यक असल्याची मागणी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने व सांस्कृतिक कार्य मंत्री, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना एका निवेदनाद्वारे केले आहे.