Home सामाजिक बल्लारपुरात २४ फेब्रुवारीला पुरोगामी साहित्य संमेलन

बल्लारपुरात २४ फेब्रुवारीला पुरोगामी साहित्य संमेलन

1218

संमेलनाच्या अध्यक्षपदी शिवा इंगोलेची निवड

प्रा. शाम मानव करणार उदघाट्न

विसापूर  : बल्लारपूर येथील राजे बल्लाळशाह नाट्यगृह येथे महाकवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीत पहिले राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलन येत्या २४ फेब्रुवारी रोजी होऊ घातले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक शिवा इंगोले, मुंबई यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उदघाट्न जेष्ठ विचारवंत प्रा. शाम मानव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी केली जात असल्याची माहिती पुरोगामी साहित्य संसदेचे अध्यक्ष नरेंद्र सोनारकर व अड.योगिता रायपूरे यांनी दिली.

.          बल्लारपूर शहरात पहिल्यांदा होऊ घातलेल्या पुरोगामी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ब्रह्मानंद मडावी हे आहेत. साहित्य संमेलनाचे उदघाट्न सकाळी ९ वाजता प्रख्यात विचारवंत प्रा.शाम मानव यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्षस्थान प्रसिद्ध साहित्यिक शिवा इंगोले, मुंबई हे भूषविणार आहेत. यावेळी विचारमंचावर अतिथी म्हणून राष्ट्रीय माजी महिला क्रिकेट खेळाडू व लेखिका निता चापले, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब आतंगळे, संतोष जाधव, निलेश ठाकरे यांची उपस्तिथी राहणार आहे.

.          दुपारी १२ वाजता प्रा. इसदास भडके यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार असून कवी संमेलनात नामवंत कवी सहभागी होणार आहेत.कवी संमेलनाचे संचालन कवी खेमराज भोयर करणार आहे. दुपारी २वाजता ‘ शिवकालीन मुस्लिम मावळ्यांची भूमिका व बादशाह जफर यांच्या पर्यंतचा प्रवास ‘ या विषयांवर प्रा.जावेद पाशा यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी 3 वाजता विलास थोरात यांचा ” हल्लाबोल ” एकपात्री प्रयोग होणार आहे.

.          दुपारी ४ वाजता उठाव साहित्य मंचाचे विद्रोही कवी संमेलन होणार असून नामांकित कवीचा सहभाग राहणार आहे. दरम्यान ५ वाजता निता चापले यांची प्रकट मुलाखत अड.योगिता रायपूरे घेतील. ६ वाजता गजलकार संजय घरडे यांच्या अध्यक्षतेखाली गजल संमेलन होणार आहे. यानंतर साहित्यिक व कवी चे पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. रात्री ८ वाजता मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, असी माहिती नरेंद्र सोनारकर, योगिता रायपूरे, राकेश सोमाणी आदीने दिली.

 राज्यस्तरीय  पुरस्कार यांचा होणार सन्मान                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने येत्या २४ फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर औद्योगिक शहरात पुरोगामी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात ‘ ते पन्नास दिवस ‘ या कादंबरीचे लेखक पवन भगत यांना राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे. अन्य पुरस्कार प्राप्त मान्यवरांत रतनकुमार साळवे, निता चापले, विजय भसारकर, रजिया मानकर, श्रुंखल भोयर, स्नेहल सिरसाट यांचा समावेश आहे.                                                                                                                                                                                                                                                                              सदर पुरस्कार राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक व अध्यक्ष विजय सूर्यवंशी, राज्य अध्यक्ष संतोष जाधव, सचिव निलेश ठाकरे, कार्याध्यक्ष गोपाल लाड आदी पदाधिकाऱ्यांनी नुकतेच घोषित केले आहे. सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रिडा प्रकारातील विशेष योगदान दिल्याबद्दल प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

error: Content is protected !!