Home सामाजिक झाडे कुणबी समजाचा प्रबोधनात्मक  स्नेहमिलन सोहळा संपन्न

झाडे कुणबी समजाचा प्रबोधनात्मक  स्नेहमिलन सोहळा संपन्न

1215

गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार 

नागभीड :   येथे झाडे कुणबी समाज संघटना तालुका नागभीड च्या वतीने झाडे कुणबी समाजाचा प्रबोधनात्मक स्नेहमिलन सोहळयाचे औचित्य साधून समाजातील गुणवंत विद्यार्थी व समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या समाजातील मान्यवरांचा सत्कार  रुख्मिनी सभागृह  नागभीड येथे पार पडला.

.           याप्रसंगी मंचावर  या  कार्यक्रमाचे उद्घाटक चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया, प्रमुख मार्गदर्शक युवा प्रबोधनकार कवि व व्याख्याते गोंदिया जितेन्द्र आसोले, कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष नोटरी भारत सरकार ॲड. गोविंद भेंडारकर, कार्यक्रमास प्रमुख अतिथी संचालक कृ.उ.बा.समिती नागभीड नरेंद्र हेमणे, अध्यक्ष दक्षता समिती नगरपरिषद नागभीड रामदास बहेकार, अध्यक्ष संजय गाधी निराधार योजना तालुका नागभीड तथा सरपंच ग्रामपंचायत मेंढा आनंद कोरे, सदस्य संजय गांधी निराधार योजना सुनिल शिवणकर, माजी उपाध्यक्ष नगरपरिषद नागभीड गणेश तर्वेकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नागभीड अवेश पठाण, माजी सभापती नगरपरिषद सचिन आकुलवार, संतोष रडके, अध्यक्ष तालुका भारतीय जनाता पार्टी  अनिल बहेकार, निर्मला पाथोडे, रुपाली कठाणे, उज्वला मेंढे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

.           कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, जगतगुरु संत तुकाराम महाराज, माँ जिजाऊ व सावित्रीबाई फुले  यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण व दिपप्रज्वल करून  स्वागत गीताने करण्यात आली.  यावेळी सन-2023 मध्ये दिवंगत झालेल्या समाजातील समाज बाधवांना श्रध्दाजंली अर्पण करून करण्यात आली.

.           याप्रसंगी  कार्यक्रमाच्या उद्घाटक आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी समाजाला मार्गदशन केले. तसेच समाजभवन व वसतीगृहाकरिता  निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. युवा प्रबोधनकार कवि व व्याख्याते गोंदिया जितेन्द्र आसोले यांनी समाज बांधवाना प्रभावी असे समाजप्रबोधन केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी सन-2023 मध्ये समाजामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, सहकार या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेल्या एकुण 14 मान्वराचा  संघटनेकडून व मान्यवरा कडून सत्कार करण्यात आला. तसेच झाडे कुणबी समाजातील वर्ग 10,12 वी व  वेगवेगळया परिक्षेत गुणवंता प्राप्त केलेल्या 30  विद्यार्थ्याना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र  देवून गौरव करण्यात आला. तसेच सामाजिक, सहकार व शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी करण्यात आलेल्या मान्यवराचा सुध्दा शाल श्रीफळ व सन्मानिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

.           कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाडे कुणबी समाज संघटना तालुका नागभीडचे अध्यक्ष सचिन कठाणे यांनी केले त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे संचालन  गुरुदास शिवणकर यांनी केले. उपस्थिताचे आभार विजय भेंडारकर, कोषाध्यक्ष  झाडे कुणबी समाजा संघटना तालुका नागभीड यांनी केले.

.           कार्यक्रमाची सागंता राष्ट्रगिताने करण्यात आली.कार्यक्रमास नागभीड तालुक्यातील झाडे कुणबी समाज बांधव हजारोच्या संख्यने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुरज भेंडारकर, सचिव झाडे कुणबी समाज संघटना नागभीड, शिवशंकर भेंडारकर, शुभम हेमणे, रितेश कोरे, सुधीर भेंडारकर, महादेव कोरे, मुर्लीधर पाथोडे, प्रभाकर भेंडारकर, जयंत कोरे, राजू हुकरे, कल्पाना दोनोडे  तसेच  समाजा बाधवांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!