पत्रकार राकेश गोविंदवार यांचे निधन

22

चंद्रपूर : ‘पुण्य नगरी’च्या चंद्रपूर जिल्हा कार्यालयातील उपसंपादक, उत्साही पत्रकार राकेश आनंदराव गोविंदवार (वय ४३) यांचे उपचारादरम्यान नागपूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिीटलमध्ये मंगळवारी दुपारी ४.३० वाजता निधन झाले. ६ जानेवारीला झालेल्या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्यानंतर नागपुरात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

.         महिनाभराच्या उपचारानंतर ६ फेब्रुवारीला अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर बुधवारी दुपारी सावली तालुक्यातील मोखाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राकेश गोविंदवार यांच्या मागे आई, पत्नी पायल, त्रिशाला व आर्या या दोन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे. सावली तालुक्यातील मोखाळा येथील रहिवासी असलेले राकेश गोविंदवार यांनी गडचिरोलीतून पत्रकारितेला सुरुवात केली. बालपणीच पितृछत्र हरपल्याने आई व दोन बहिणींना त्यांनी आधार दिला होता. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे, मृदूभाषी आणि अभ्यासू पत्रकार होते. मागील २५ वर्षांपासून ते पत्रकारितेत होते. त्यांच्या निधनाने गोविंदवार आणि कागदेलवार परिवाराची अपरीमित हानी झाली आहे.