मंगेश पोपटे यांचे निधन

27

सिंदेवाही :- जामसाळा ( नवीन) येथील मंगेश रमेश पोपटे यांचे वयाच्या ३६ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मागील पाच वर्षांपासून ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद मार्फत पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत भरारी महिला प्रभाग संघ मोहाळी-वासेरा येथे कृषी समुदाय व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

.          अलीकडेच त्यांचे नागपूर येथील नामांकित दवाखान्यात हृदयावर शस्त्रक्रिया करून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मंगेश हा साध्या आणि सरळ स्वभावाचा व्यक्ती होता. त्यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.