Home चंद्रपुर जिल्हा विशेष रेतीतस्करांनी लावली शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्याची वाट

रेतीतस्करांनी लावली शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्याची वाट

1361

रेती तस्कराच्या मुसक्या आवळून रस्ता वाहतूक थांबवावी : शेतकऱ्यांची मागणी

नेरी : नेरी सोनेगाव येथील नदिघाटावरून रेती तस्कर हे रेतीची तस्करी करीत असून भुराजी देवस्थान कडे जाणाऱ्या पांदण रस्त्याने सर्रास रेतीची वाहतूक केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या पांदनरस्त्याची वाट लागली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्ता खचकेमय झाला आहे. तेव्हा संबंधित विभागाने रेतीतस्करांच्या मुसक्या आवळून सदर पांदनरस्ता वरून वाहतूक थांबवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

.           नेरी येथून भुराजी देवस्थान कडे जाणाऱ्या पादन रस्त्याने सोनेगाव नदी घाटावर तस्कर रेतीची तस्करी करण्यासाठी ट्रॅकटर नी जातात आणि नदिघाटावरून त्याच मार्गाने येतात त्यामुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. सदर रस्त्याला शेकडो एकर शेतजमिनी लागून आहेत. आणि शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना हा एकच मार्ग असल्याने या रेती तस्करी च्या वाहतुकीमूळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तस्कर हे रात्री आठ वाजे पासून पहाटे पर्यंत रेतीची वाहतूक करतात. त्यामुळे रस्त्याची वाट लागून शेतकरी चिंताग्रस्त झाले. सदर रस्त्याला अनेकदा खडीकरण करण्यासाठी मागणी सुद्धा केली मात्र संपूर्ण दुर्लक्ष होत आहे. तेव्हा संबधीत विभागाने रस्ता खडीकरण करावे. आणि रेती तस्कर या मार्गाने बंद करावे त्यांना पकडून कारवाई करावी. अशी मागणी काशिनाथ चांदेकर सहित अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

error: Content is protected !!