चिमुर तालुक्यातील घटना
नेरी : चिमूर तालुक्यातील दोन ठिकाणी घडलेल्या विचित्र अपघातात 3 जण गंभीर तर 2 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मार्गावर बुधवारी दि 31 ला घडल्या.
. शेतात जात असताना वडाच्या झाडावरील वानरांना हाकलत असताना अचानक एका दुचाकीने शेतकर्याला धडक दिली. यात दुचाकीस्वार व शेतकरी दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना नेरीवरून जवळ असलेल्या बोथली येथील काजळसर मार्गावर बुधवारी दि 31 ला सकाळी 11 वाजता दरम्यान घडली. तर नेरी मार्गावर कळमगाव जवळील हनूमान देवस्थान जवळ दुचाकीने दुचाकीला मागून धडक दिल्याने दोन गंभीर एक जखमी झाल्याची घटना सायंकाळ च्या सुमारास घडली.
. प्राप्त माहिती नुसार रामलाल मोतीराम ढोक (35) रा. खरबी ता. नागभीड हे काजळसर मार्गाने बोथली ला दुचाकीने येत असताना बोथली जवळील वडा च्या झाडाजवळ बोथली येथील बाजीराव कारमेंगे (55) हे वडाच्या झाडावरील माकडे हाकलीत होते माकडे हाकलताना ते झाडावरील माकडांकडे बघत होते. आणि माघे पुढे आजूबाजूला होत होते. इतक्यात रस्त्याच्या त्याच बाजूने दुचाकी आली दुचाकीस्वार रामलाल गोधळले आणि अचानक ब्रेक लावल्याने दुचाकीने बाजीराव याना धडक देत दुचाकी घेऊन खाली पडले. यात दोघेही जखमी झाले. तर रामलाल रस्त्यावर पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ प्यारेखा पठाण यांनी स्वतःच्या वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर चिमूर वरून नेरीला दुचाकीने जात असताना मानेमोहाळी येथील सत्यपाल चौधरी (26) व मंगेश कडूकार (27) यांनी त्याच मार्गावर समोर जात असलेल्या वाघेडा येथील दिलीप मेश्राम (46) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात दोन्ही दुचाकी रस्त्यावर पडल्या आणि भीषण अपघात झाला यात सत्यपाल चौधरी व मंगेश कडूकार याना गंभीर मार लागला तर दिलीप मेश्राम किरकोळ जखमी झाले. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.


