महामानवाचा जयघोष
अवतरली ‘निळे पाखरे’
आशिष गजभिये
चिमूर : अस्पृश्यता लादलेल्या समाजाला अंधकरातून युगप्रवर्तकाने ज्ञानाच्या प्रकाशात आणले.३१जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ हे मुखपत्र काढून मुक्ती संग्रमाची सुरुवात केली होती. समाजाला समतेचा सूर्य दाखविला. मागील ३०वर्षापासून तपोभूमी संघरामगीरी येथे या धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.या धम्म क्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो निळ्या पाखरांनी बुधवारी या ऐतीहासिक भूमीत येवून वंदन केले.
![]()
. सम्राट अशोकाच्या काळापासून बुद्ध भिक्खू व उपासक – उपसिकांच्या साधना व अधिष्ठान करण्याची भूमी अशी ओळख असलेल्या साधनाभूमीत मागील ३०वर्षापासून द्विदिवसिय धम्म समारंभाकरीता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो धम्म बांधवांचे थवे संघरामगीरी दाखल होतात. मंगळवारी दिवसभर विविध कार्यक्रम व रात्री महापरित्रान पाठाकरीता कडाक्याच्या थंडीतही धम्मबांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. बांगलादेश चे तेरावे संघराजा, महास्थाविर शिलानंद ,महस्थाविर ज्ञानज्योती यांनी अष्टशिल वंदन केले. यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघ व शेकडो भिख्खू उपस्थित होते.बुधवारी समारोपीय कार्यक्रमात अस्पृश्यता मुक्ती लढ्याचे बिगुल फुंकणाऱ्या अजरामर कार्याचा व इतिहासाचे स्मरण भावी पिढीला करून देण्यासाठी सम्यक क्रांतीच्या इतिहासाला नव्याने उजाळा देण्यात आला.
धम्म चळवळ गतिमान करा – महस्थविर ज्ञानज्योती डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षा समारोहातून अनुयायांना संबोधित करताना बुद्धमय भारत निर्माण करण्याचे स्वप्न बघितले होते व अनुयायांना संदेश दिला होता.त्याच स्वप्नपर्तीसाठी तुमची जबाबदारी व समाजाप्रती असलेली जाणीव ओळखून बुद्धमय भारत निर्माण करण्यासाठी धम्म चळवळ गतिमान करा, असा संदेश भिख्खू संघ, संघरामगिरी संघनायक महास्थविर ज्ञानज्योती यांनी उपस्थित उपासक-उपासिकाना दिला.


