डब्ल्यूएसएफचा अक्षय नागपूर विद्यापीठ व्हॉलीबॉल संघात

29

वरोरा 

.         वरोरा स्पोर्टस फाउंडेशन, वरोरा व लोक शिक्षण संस्था, वरोडा चा व्हॉलीबॉल खेळाडू व ए डी एम कॉलेज भारशिंगी नागपूरचा विद्यार्थी अक्षय पुरुषोत्तम चौधरी याची नांदेड येथे होणाऱ्या वेस्ट झोन आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धे करिता नागपूर विद्यापीठ व्हॉलीबॉल संघात निवड झालेली आहे.

.         याआधी अक्षयने सीनियर नॅशनल राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा व राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व केले. अक्षय याचे निवडीबद्दल वरोरा शहरात सर्वत्र कौतुक होत असून, अक्षयच्या या यशाबद्दल लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांतजी पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्णजी घड्याळ पाटील, कार्यवाह विश्वनाथजी जोशी, अॅड. दुष्यंत देशपांडे, वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोरा चे अध्यक्ष गजानन जीवतोडे, कार्याध्यक्ष किशोर पिरके, ए डी एम कॉलेज भारशिंगी चे प्राचार्य डॉ. प्रशांत पवार, संजय अंबुलकर, हेमंत घीवे, राजेश मत्ते, प्रा. प्रशांत खुळे यांनी अभिनंदन केले. अक्षयने आपल्या यशाचे श्रेय ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील बांगडे, मुकुल कातांगडे, देवानंद डुकरे, व प्रा. उत्तम देऊळकर, सागर कुरेकार व वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोराच्या वरिष्ठ खेळाडूंना दिले.