Home शैक्षणिक आनंदवनात बीजोत्सव २०२३ चे  आयोजन* 

आनंदवनात बीजोत्सव २०२३ चे  आयोजन*

808

कृषी महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम_ 

वरोरा

.          आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा, आनंदवन कृषी तंत्रनिकेतन आनंदवन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान आनंदवन  येथे बीजोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आलेले आहे. महारोगी सेवा समितीच्या अमृत महोत्सवी वर्ष तथा आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या पर्वावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

.          निसर्गातील उपलब्ध संसाधनाच्या अविवेकी  वापरामुळे सध्याच्या परिस्थितीत हवामान बदल, पर्यावरणीय प्रदूषण, मातीचे धोक्यात आलेले आरोग्य आणि पर्यायाने मानवी आरोग्यासमोर उभी झालेली आव्हाने लक्षात घेता देशी  बियाण्यांच्या संवर्धनाकरिता तसेच विषमुक्त शेतीची संकल्पना शेतकरी तथा  विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी  याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन आनंदवनातील मंत्री हॉलमध्ये करण्यात आलेले आहे.

.          या उत्सवा मधे देशी बियाण्यांचे प्रदर्शन, पर्यावरणाशी निगडित शाश्वत शेतीला पूरक अशा अनेक विषयांवर विविध तज्ञांचे मार्गदर्शन ,पर्यावरण पूरक अनेक परंपरागत पद्धतीचे  प्रात्यक्षिक तथा भरड धान्य युक्त  अनेक रुचकर चविष्ट पदार्थांची मेजवानी विद्यार्थी, शेतकरी तथा ग्राहक यांना मिळणार आहे.

.          बीजोत्सवाचे उद्घाटन दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता  होणार असून उद्घाटक म्हणून  डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू माननीय डॉ शरद गडाख हे उपस्थित राहणार आहे. अध्यक्षस्थान डॉ विकास आमटे सचिव महारोगी सेवा समिती वरोरा हे भूषवतील तर विशेष अतिथी म्हणून  डॉ. डी बी.उंदीरवाडे संचालक कृषी विस्तार  डॉ पं. दे. कृ. वि. अकोला,  डॉ. एस एस माने संचालक, शिक्षण डॉ पं. दे. कृ. वि. अकोला, शंकर तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर हे उपस्थित राहतील तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून पल्लवी आमटे,  सुधाकर कडू विश्वस्त महारोगी सेवा समिती वरोरा, डॉ दिलीप पेशवे, सुभाष शर्मा , वसंत फुटाणे, प्राची माहूरकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांनी केले आहे.

error: Content is protected !!