Home सामाजिक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

806

चंद्रपूर

.          बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी भवन ,कॉलरी रोड बल्लारपूर येथे अहिंसचे प्रेरणास्थान राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या फोटोला मालार्पण करून त्यांच्या स्मुर्तीला उजाळा दिला.

.          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल करीम होते,तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी,बल्लारपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदा उपरे,सेवादल अध्यक्ष प्राणेश अमराज, न.प.माजी गट नेते देवेंद्र आर्य, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, इस्माईल ढाकवाला, अफसाना सैयद, रोजिदा ताजुद्दीन, रेखा रामटेके, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, युवा नेते राकेश मुलचंदानी, नरसिंग रेब्बावार, डेव्ही ड कामपेल्लि, अनिल खरतड, ताहेर हुसेन, फारुख खान, सुरेश बोप्पनवार, परिष महाजनवार, आकाशकांत दुर्गे, मेहमूद पठाण, नाना बुंदेल, अरविंद वर्मा, प्रफुल्ल बोप्पनवार आदींची उपस्थिती होती.

.          यावेळी घनश्याम मुलचंदानी म्हणाले,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अमूल्य योगदान दिले.त्यांच्या योगदानामुळे देश घडला आहे. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी देशाच्या जडणघडणीत मोठा हातभार लावला. जय जवान, जय किसन ही देश वासियांना साद घालून आपल्या रक्षणार्थ जवानांचे मनोबल वाढविले.अन्नदाता शेतकरी वर्गाला प्रोत्साहन देण्याचे कार्य, या महान नेत्यांनी केले. त्यांचे कार्य आजही सर्वांना प्रेरणादायी आहे, असे मुलचंदानी यांनी अभिवादन करताना मनोगत व्यक्त केले. संचालन देवेंद्र आर्य यांनी केले, तर आभार अब्दुल करीम यांनी मानले.

error: Content is protected !!