Home राजकीय नंदोरीत शिवसेनेची (उबाठा) “होऊ द्या चर्चा ” ने भाजप सरकारची पोलखोल

नंदोरीत शिवसेनेची (उबाठा) “होऊ द्या चर्चा ” ने भाजप सरकारची पोलखोल

810

चंद्रपुर

.              शिवसेना (उबाठा) च्या वतीने वरोरा, भद्रावती तालुक्यातील प्रत्येक गावात “होऊ द्या चर्चा ” हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमा च्या माध्यमातून भाजप सरकार ची पोलखोल केल्या जात असून सरकारच्या धोरणावर थेट गावकर्‍यांशी चर्चा केली जात असून या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या प्रमाणात पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.

.              भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे नुकतीच “होऊ द्या चर्चा ” हा कार्यक्रम पार पडला. यात वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा माजी अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक चंद्रपुर चे रविद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती सभापती भास्कर ताजने, भद्रावती तालुकाप्रमुख तथा नगरसेवक नगरपालिका भद्रावती चे नरेंद्र पढाल, माजी नगराध्यक्ष नगरपरिषद भद्रावती ज्ञानेश्वर डुकरे, सघंटक वरोरा -भद्रावती विधानसभा मंगेश भोयर, तालुका महीला सघंटीका तथा माजी उपसभापती  कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती च्या अश्लेषा जिवतोडे (भोयर), उपविभाग प्रमुख नंदोरी पं.स. शरद जांभुळकर, उपविभाग प्रमुख, कोकेवाडा पं.स. मंगेश बल्की, नितेश बुरांडे, शाखा प्रमुख अखिल कुलसंगे नंदोरी यांचे उपस्थितीत पार पडला.

.              “होऊ द्या चर्चा ” या कार्यक्रमा अंतर्गत भाजप सरकारच्या विविध योजना बाबत ताशेरे ओढण्यात आले तर गृहिणीच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे गॅस सिलेंडर यावर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी भाजप सरकारची चांगलीच खिल्ली उडविली

error: Content is protected !!