अज्ञात इसमावर गुन्हे दाखल
नेरी सोनेगाव मार्गावरील घटना
नेरी : नेरी येथे दि 30 डिसें ला मध्यरात्री बारा ते एक वाजता च्या सुमारास एका अज्ञात इसमाने नेरी सोनेगाव मार्गावरील भुराजी देवस्थान कडे जाणाऱ्या रस्त्याजवळ रोडवर (गुरांचे वैरण) तनिस भरून ठेवलेल्या ट्रॅक्टर च्या ट्रॉलीला आग लावून पेटवून दिले. त्यामुळे लागलेल्या आगीत ट्रॉली सहित टायर जळून खाक झाले. यात ट्रॅक्टर मालकाचे खूप मोठे नुकसान झाले असून सदर प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. असून अज्ञात इसमावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
. नेरी येथील संजय चांदेकर यांच्या मालकीचे ट्रॅक्टर नी दि 29 ला 5 वाजता स्वतःच्या शेतातील तनिस ट्रॉलीत भरून रेगांबोडी येथील शेतकऱ्यांना त्याच्या जनावरांना वैरण म्हणून नेऊन देण्यासाठी नेरी सोनेगाव मार्गावर रस्त्याच्या बाजूला ट्रॉली लावले. आणि ट्रॅक्टर चा मुंडा घेऊन घरी परत आले असता पहाटे जाऊन ट्रॅक्टर ने रेगांबोडिला जायचे असे ठरविले असता पहाटे चार वाजताच्या सुमारास गेले असता रस्त्यावरून खूप मोठा पेटण्याचा प्रकाश दिसला असता जवळ गेल्यावर ट्रॉलीला आग लागली असल्याचे दिसले आग इतकी भयंकर होती की संपुर्ण ट्रॉलीतील तनिस जळीत होती तर आगीने रौद्ररूप धारण करीत ट्रॉलीचे दोन्ही टायर ला जाळून भस्म केले होते आता फक्त ट्रॉली क्र एम एच 36 G 1116 या क्रमांकाच्या ट्रॉलीचा सांगाळा उरला आहे.
. कुणीतरी अज्ञात इसमाने हेतु पुरस्सर ट्रॉलीला आग लावली असावी असा संशय असून सदर घटनेची पोलिसांना माहिती देत तक्रार देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस विशाल निमेकर व मेजर बोरसरे यांनी सदर जळलेल्या ट्रॉलीचा पंचनामा करून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. यात 4 हजारांची तनिस आणि 40 हजार रुपयांचे टायर असे एकूण 44 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तेव्हा प्रशासनाने ट्रॅक्टर मालक संजय चांदेकर यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच अज्ञात गुन्हेगाराचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.


