वरोरा : झाडीबोली साहित्य मंडळ साकोली द्वारा आयोजित, झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोरा च्या रोप्य महोत्सवी पर्वावर दि. २८ ला “झाडीबोली साहित्य संमेलन” श्रद्धेय बाबा आमटे साहित्य नगरी वरोरा येथे संपन्न झाले.
. या झाडीबोली साहित्य संमेलनामध्ये, कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक लोकराम शेंडे हे होते तर, कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, प्रमुख पाहुणे समाजसेवक विकास आमटे आनंदवन, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचे हस्ते नवं कवी नीरज आत्राम लिखित “काय म्हणतील लोक” या कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले.
. या कार्यक्रमाला प्रसिद्ध प्रबोधनकार इंजि. भाऊ थुटे, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले चंद्रपूर, डॉ. हेमकृष्ण कापगते, ऍड. लखनसिंह कटरे, हिरामण लांजे, राजन जयस्वाल, ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना. गो. थुटे उपस्थित होते. या कार्यक्रमाला कवी, कवयित्री साहित्यिक, कलाकार, आणि मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवर पाहुण्यांनी कवी नीरज आत्राम यांचे भरभरून कौतुक केले आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


