ब्रम्हपुरी : माता रमाई बुध्दीझम परियणय ब्रम्हपुरी यांच्या विद्यमाने आज रविवार दि. २९ डिसेंबर ला सकाळी १० वाजता राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, तुळजाबाई प्राथमिक शाळेच्या मागे, आरमोरी रोड, गडचिरोली, येथे निःशुल्क उपवर – वधु परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
. सद्या धकाधकीच्या जीवनामध्ये भेटीगाठी कमी झालेल्या आहेत. त्यामुळे एकमेकांसोबत बरेच दिवस भेट होत नसल्याने एकत्र आणण्याकरीता तसेच समाजातील पालक आणि उपवर – वधुसाठी हा खास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजबांधव एकत्रित यावे आणि उपवर- वधु यांचा परिचय होऊन लग्नगाठ बांधण्याचा उद्दात हेतू आहे.
. या मेळाव्यामध्ये युवक युवतीचा परिचय होणार असून त्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपवर-वधू यांची नोंदणी मेळाव्याच्या ठिकाणी मेळाव्याच्या दिवशी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान करण्यात येईल. उपवर-वधु यांनी मेळाव्यात येताना एक फोटो सोबत आणावा. या मेळाव्यात उपवर-वधु घटस्फोटित वधु-वर विधवा -विधुर वधु-वर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक घनश्याम रामटेके, रमेश बागडे, धर्मप्रकाश शेंडे यांनी केले आहे.


