बल्लारपूर येथे कांग्रेस कार्यालयात श्रद्धांजली
विसापूर : भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाच्या कानाकोपऱ्यात शोककळा निर्माण झाली. त्यांना आदरांजली अर्पण करण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर येथे कांग्रेस पक्षाच्या कार्यालयात कार्यक्रम पार पडला.
. यावेळी मान्यवरांनी देशाने डॉ. मनमोहनसिंग यांच्या रूपातील दूरदृष्टीचे नेतृत्व गमावल्याची शोकसंवेदना व्यक्त करून आदरांजली वाहिली. बल्लारपूर तालुका कांग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी म्हणाले, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग विनयशील होते. त्यांची विद्वता जगाला प्रेरणा देणारी होती. ते जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ होते. सभ्यतेचे ते पुजारी होते. त्यांचा देशाच्या दहा वर्षाचा कार्यकाळ सामाजिक न्याय, लोकशाही मूल्य रूजविणारा होता. त्यांची कामगिरी देशासाठी गौरवशाली होती, असे सांगून त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रती भावना व्यक्त केली.
. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, माजी गटनेते देवेंद्र आर्य, बल्लारपूर तालुका कांग्रेसचे अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी नगरसेवक इस्माईल ढाकवाला, प्राणेश अमराज, दौलत बुंदेल, शरद अलोने, नाना बुंदेल, नरेश गुंडापेल्ली, सुरेश बोप्पनवार, राजू मार्गमवार, नरेश मुदंडा आदी कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


