नागभीड : तालुक्यातील मोहाळी मोकासा येथील श्रीराम कृषी केंद्राचे संचालक नितीन गजभिये यांचे 28 डिसेंबरला पहाटे 4 च्या सुमारास निधन झाले. अतिशय सक्रिय युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणुन त्यांची ओळख होती. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई, वडील, भाऊ व दोन बहिणी आहेत.


