Home चंद्रपुर जिल्हा विशेष मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य योजनेचे थकीत मानधन तात्काळ द्या

मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य योजनेचे थकीत मानधन तात्काळ द्या

1191

अस्थायी कर्मचाऱ्यांचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन

वरोरा : महायुती सरकार च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सुरु असलेली मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य योजनेचे मानधन अस्थायी उमेदवारांना अजून पर्यंत मिळालेले नाही, परिणामी बेरोजगार युवकांना हलकीचे जीवन जगावे लागत असल्याने त्यांचे थकीत मानधन तात्काळ देण्यात यावे. या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले.

.     महाराष्ट्र राज्यातील युवा वर्ग बेरोजगार राहू नये व त्यांना रोजगार मिळावा म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य योजना सुरु करण्यात आली. पण त्यांना त्यांच्या हक्काच्या मानधना पासून वंचित राहावं लागत आहे. करिता उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत राज्य सरकार ला निवेदन दिले. व सर्व उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी वाढवून देण्याची विनंती या निवेदनात केलेली आहे. सप्टेंबर पासून रुजू झालेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांचे फक्त एकाच महिन्याचे मानधन देण्यात आलेले आहे. यामुळे बेरोजगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. निवेदन देताना वरोरा तालुक्यातील सर्व मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य योजनेचे अस्थायी कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!