सिंदेवाहीत कडकडीत बंद
परभणी प्रकरणाचा निषेध
अमित शहा माफी मांगो च्या घोषणा
जय, जय, जय, जयभीम ने दुमदूमली वरोरा नगरी
तहसीलदारांना निवेदन
सिंदेवाही / वरोरा : परभणी येथे समाज कंटकाने संविधानाची अवहेलना करून अपमान केल्याने परभणीतील संविधान प्रेमींनी रस्त्यावर उतरून समाज कंटकाला तात्काळ अटक करण्यासाठी आंदोलन केले असता, तेथील पोलिसांनी आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज करून ॲड .सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली.आणि पोलीस कोठडीत बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली असल्याने त्यांचे मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा, तसेच देशाचे गृहमंत्री अमितशाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपमानित करणारे वक्तव्य केल्याने त्यांनी तत्काळ माफी मागावी. यासह अन्य मागण्या करीत शुक्रवारी सिंदेवाहीत कडकडीत बंद ठेऊन दुपारी तालुक्यातील आंबेडकरी जनतेचे निळे वादळ तहसील कार्यालयावर धडकले. तर वरोरा शहरात शेकडो भीमसैनिकांनी आक्रोश मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन सादर केले.
![]()
. परभणी येथे बहुचर्चित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ एका समाज कंटकाने संविधानाची अवहेलना करून अपमान केल्याने परभणीतील संविधान प्रेमींनी रस्त्यावर उतरून समाज कंटकाला तात्काळ अटक करण्यासाठी आंदोलन केले असता, तेथील पोलिसांनी आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज करून ॲड .सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली.आणि त्यांना पोलीस कोठडीमध्ये जबर मारहाण केली. त्यातच त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेच्या निषेध करून सोमनाथ सूर्यवंशी यांचे मारेकरी असलेल्या पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा देऊन त्यांचे कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपमानित करणारे वक्तव्य केल्याने त्यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी. या मागणी सह अन्य मागण्यांचे निवेदन घेऊन शुक्रवारी सिंदेवाही तालुक्यातील हजारो आंबेडकरी जनतेचा जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्याठिकाणी आंबेडकरी समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
. यावेळी सिंदेवाही येथील सुर्याजीत खोब्रागडे, वासेरा येथील कार्यकर्ते महेंद्र कोवले, रत्नापूर येथील मंगेश मेश्राम, लाडबोरी येथील चंद्रप्रकाश चहांदे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष डॉ राजपाल खोब्रागडे, सिंदेवाही येथील शांताबाई पाझारे, रंजना चूनारकार, नंदू रावजी खोब्रागडे, इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर तहसीलदार संदीप पानमंद यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विहारात तथागत भगवान बुद्धांना अभिवादन करण्यात आले. सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने महापुरुषांचा जयघोष करीत तालुक्यातील असंख्य आंबेडकरी जनता तहसील कार्यालयावर धडकली. आणि शासनाला विविध मागण्याची पूर्तता करण्यासाठी तहसीलदार यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.
. यासाठी भोजराज सोरदे, नंदू काणुजी खोब्रागडे, गणेश मेश्राम, नंदू रावजी खोब्रागडे, तेजस डोंगरे, तसेच इत्यादी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता. तर वरोरा शहरात भंतेंच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या चना आक्रोश मोर्चात शुभम चिमूरकर, केशव ठमके, पडवेकर गुरुजी, रामाजी हस्ते, जयंत ठमके, बंडू लगाने, प्रीतम सोनारकर, विलास टिपले, दशरथ शेंडे, एडवोकेट अलोने, एडवोकेट पेटकर, सिद्धार्थ ढोके अतुल वानखेडे सह मोठ्या प्रमाणात भीम सैनिक उपस्थित होते.


