प्रवाशांची आतुरता
२१ किमीनी झाले अंतर कमी
मारोती चाफले
गडचांदूर : चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या, कोरपना तालुक्यातील पारडी ते झरी तालुक्यातील खातेरा दरम्यानच्या पैंगनगा नदी घाटावर चौथ्या पुलाची निर्मिती झाली. याला दीड वर्षाहून अधिकचा कालावधी लोटला. मात्र लोकार्पण कधी होणार याची आतुरता प्रवाश्यामध्ये वाढली आहे.
. चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा रेषा असलेल्या पैनगंगा नदीवरील हा चौथा मोठा पुल आहे. यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी व वणी या दोन तालुक्याची चंद्रपूर जिल्ह्यातील एकट्या कोरपना तालुक्याची सीमा या नदीला लागली आहे. कोडशी खू, वनोजा, विरुर पुलानंतर या पुलाच्या निर्मितीचे काम आता पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे कोरपना ते मुकुटबन या दोन्ही शहरांना जाण्या येण्याचा कमी अंतरात प्रवास सुलभ झाला आहे. विशेष म्हणजे कोडशी खू, वनोजा पुलाची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर, विरुर् पुलाची निर्मिती डब्लू सी एल तर या नवनिर्मित पुलाची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडाच्या माध्यमातून झाली आहे. परंतु विधानसभा निवडणुकी पूर्वी या पुलाचे लोकार्पण होणे अपेक्षित असताना ते आजगायत झाले नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
पुन्हा किमान दोन पूलाची गरज कोरपना तालुक्यातील गांधीनगर – तेजापुर, भारोसा – जुगाद या दोन पैनगंगा नदी घाटावर पुलाची आवश्यकता आहे. या मार्गावर पूलाची निर्मिती झाल्यास दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा रहदारीसाठी कमी अंतरात जाणे येणे सोपे होईल.


