कांग्रेसचे नगरपालिका चौकात धरणे आंदोलन
भाजपाचा लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न
बल्लारपूर : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य सभेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमानास्पद वक्तव्य केले. यामुळे देश भरात संताप व्यक्त केला जात आहे. भाजपा देशाच्या ज्वलंत समस्येपासून नागरिकांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप करून कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार बल्लारपूर येथील नगरपालिका चौकात धरणे आंदोलन केले. गृहमंत्री अमित शहांच्या वक्त्यांचे तीव्र पडसाद बल्लारपुरात उमटले. यावेळी कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.
. भारतीय संविधान बहाल झालेल्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून लोकसभा व राज्य सभेत संविधानाचे महत्व अधोरेखित करण्याच्या अनुषंगाने देश भर चर्चा केली जात आहे. यावेळी राज्यसभेत चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भर सभा गृहात अपमानास्पद भाषणातून टिप्पणी केली. यावर विरोधी पक्षनेते व इंडिया आघाडीच्या वतीने आक्षेप घेतला. गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणी देशाची माफी मागावी,असा आग्रह धरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, ही मागणी लावून धरली.उद्योगपती गौतम अदाणी यांचेवर अमेरिका मध्ये लावण्यात लाच प्रकरणाच्या आरोपाकडे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहे.
. मनीपूर, उत्तरप्रदेश मधील संबल येथील हिंसाचार घटनेवर भाष्य करण्यास सत्ताधारी बगल देत आहे. अन्य ज्वलंत समस्येपासून पळ काढण्यासाठी भाजपप्रणित सरकार देशाचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देशाचे गृहमंत्री अपमानजनक टिप्पणी करून संविधानाचे महत्व कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
. दरम्यान परभणी व बीड जिल्ह्यात ज्या हत्येच्या घटना झाल्या.मुंबई येथील कांग्रेसच्या कार्यालयावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याबद्दल तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलनात शहर व तालुका कांग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले. यामध्ये माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, दिलीप माकोडे, शहर कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल करीम, माजी नगरपालिका गटनेते देवेंद्र आर्य, पवन मेश्राम, भास्कर माकोडे, नरेश मुदंडा, नरसिंह रेब्बावार, इस्माईल ढाकवाला, प्राणेश अमराज, रवि कोडापे, कांग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, वासुदेव येरगुडे, दिपक धोपटे, अयुब शेख, दौलत बुंदेल, कासिम शेख, सतीश करमनकर, अफसाना सय्यद, शिला साळवे, छाया शेंडे, अम्कुबाई भुक्या, आनंद रामटेके, मधुकर पोडे, अनिल मारशेट्टिवार, करण कामटे, रमेश लालवाणी, अजय दुपारे आदींचा सहभाग होता.


