Home चंद्रपुर जिल्हा विशेष शुल्लक कारणावरून अपंग युवकास मारहाण

शुल्लक कारणावरून अपंग युवकास मारहाण

1287

आरोपीवर गुन्हा दाखल

नेरी येथील घटना

नेरी : येथील आठवडी बाजारात ई रिक्षा मधील कॉरेट खाली पडले. या शुल्लक कारणावरून एका अपंग युवकाला शिवीगाळ करीत लाताबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण कांबळी विरुद्ध चिमुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

.     सविस्तर माहिती अशी की नेरी येथील बुधवारी बाजार असल्याने बाजार संपल्यावर शंकर बंडू दंडारे (27) हा युवक शिल्लक भाजीपाल्याचे कॉरेट ई रिक्षा मध्ये टाकून घराकडे नेत असतांना गुरुदेव सेवा मंडळ जवळ कॉरेट घसरून पडले असताना ते उचलण्यासाठी ई रिक्षा थांबविला असता ते उचलत असताना प्रवीण वामन कांबळी यांनी शुल्लक कारणांसाठी लाता बुक्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली.  शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असता पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपी प्रवीण कांबळी यांच्यावर 118 (1), 352 351(2) कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!