Home राजकीय भद्रावतीत केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या वक्तव्याचा निषेध

भद्रावतीत केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या वक्तव्याचा निषेध

1238

तहसिलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

भद्रावती : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा भद्रावती शहरातील सर्व राजकीय पक्षांतर्फे तसेच सामाजिक संघटनांतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच अमित शहा यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शहरातील सर्व राजकीय पक्षांतर्फे तसेच सामाजिक संघटनांतर्फे शुक्रवारी तहसीलदारांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले.

.       संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेतील विरोधी बाकांवरील खासदारांना उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी निंदाजनक वक्तव्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक संघर्ष व कार्याचा परिणाम म्हणून या देशातील वर्णव्यवस्थेने व जातीप्रथेने प्रताडीत केलेल्या दलित व बहुजन समाजाला मानसन्मान व स्वाभिमानाचे जगणे प्राप्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच शेकडो वर्ष सामाजिक व आर्थिक गुलामीत असलेल्या बहुजन समाजास खरे स्वातंत्र्य प्राप्त झाले. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन निर्माण झाली आहे असे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति श्रद्धा व निष्ठा बाळगणाऱ्या भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी असे निंदाजनक वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात येत असून त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी असे निवेदन शहरातील सर्वच राजकीय पक्षांतर्फे तहसीलदारांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे.

.      यावेळी कुशल मेश्राम, विशाल बोरकर, राजरतन पेटकर, फयाज शेख, सुरज गावंडे, विशाल कांबळे, विकास दुर्योधन, डॉ. अमित नगराळे, शंकर मून व ईतर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

error: Content is protected !!