Home चंद्रपुर जिल्हा विशेष नागभीड – नागपूर महामार्गांवरील खड्डे देत आहे अपघाताला निमंत्रण 

नागभीड – नागपूर महामार्गांवरील खड्डे देत आहे अपघाताला निमंत्रण

1267

नागभीड : नागभीड ते नागपूर या महामार्गांवरील नवखळा ते बामणी पर्यंत खड्ड्याची शृंखला आहे. हे खड्डे जणू काही अपघाताला निमंत्रण तर देत नाही ना ? असा सवाल प्रवासी करत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

.     नागभीड नागपूर हा महामार्ग आहे. या महामार्गावरील  दररोज हजारो वाहने धावतात. सायकल पासून ते दहाचाकी वाहणापासून या मार्गांवर वाहतूक असते. जेव्हा या मार्गाचे काम झाले तेव्हा साईड भरल्या नाही. कुठे भरल्या तर कुठे  थातुरमातुर साईड भरल्या. मात्र याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. या मार्गाने अनेक लोकप्रतिनिधी ये जा करतात. मंत्री सुद्धा येतात पण रस्त्याकडे लक्ष नाही. रस्ते बनविताना गुणवंत्ता राहत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डोळे बंद करून कंत्राटदाराचे बिले काढतात. त्याचा त्रास मात्र सामान्य जनतेला भोगावा लागत आहे. तर खराब रस्त्याचा टॅक्स सुद्धा नागरिकांना भरावा लागत आहे. नवखळा गावापासुन रस्त्याच्या दोन्ही बाजूला जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. या कडे मात्र कोणाचेही लक्ष नाही.

.       दुहेरी वाहन आले तर एका वाहनाला थांबावे लागते. खड्ड्यामुळे साईड घेता येत नाही. दोन ते तीन फुटाचे खड्डे पडलेले आहेत. दिवसाला ठीक आहे पण रात्रौच्यावेळी या मार्गांवर मोठा अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. रोड बनवितानी साईड बरोबर भरल्या असत्या तर आज एवढे मोठे खड्डे पडले नसते. तालुक्यात सुद्धा अनेक मार्ग आहेत तिथे साईड भरल्या जात नाही. एका महिन्यात रस्ते फुटलेले आहेत. सरकार करोडो रुपये रस्त्यावर खर्च करत आहे. मात्र रस्ते बनविताना गुणवत्ता राहत नाही. त्यामुळे रस्त्याची वाट लागत आहे. याचा विचार मायबाप सरकारने केला पाहिजे. असा सवाल आता नागरिक करू लागले आहे.

error: Content is protected !!