Home चंद्रपुर जिल्हा विशेष बसची दुचाकीला धडक : दुचाकीस्वार ठार

बसची दुचाकीला धडक : दुचाकीस्वार ठार

1281

बस रस्त्याखाली उतरली

12 प्रवासी किरकोळ जखमी

गडचांदूर शहराजवळील घटना

गडचांदूर : शेतातील कामे उरकून दुचाकीने घराकडे परत येत असताना दुचाकीला बसची धडक बसली. धडकेनंतर बस रस्त्याच्या खाली उतरल्याने बस मधील 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले तर दुचाकीस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली. कान्हू डहाले (५०) राहणार गडचांदूर असे मृतक दुचाकीसवाराचे नाव आहे.

.       राज्य परिवहन महामंडळ ची बस क्रमांक एमएच ३४ बीटी १९४१ ही किनवट ते चंद्रपूर कडे येत असताना राजुरा-गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गावर गडचांदूर शहराजवळील बालाजी सेलिब्रेशनजवळ बसने दुचाकी क्रमांक एमएच ४० सीजे ४२१२ ला धडक दिली. यात  दुचाकीस्वार कान्हू डहाले गंभीर जखमी झाले होते त्यांना ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे तात्काळ दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान कालिदासचा मृत्यू झाला. बस चालकाने दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र बस वरिल नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूने असणारी बस रस्ता दुभाजक ओलांडून उजव्या बाजूच्या रस्त्याच्या कडेला खाली उतरली. परंतु नशीब बलवत्तर असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बस चालकासह काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले. बस चालक सुधाकर सलाम (५०), सचिन कुलमेथे (३५) रा. हातलोनी व इतर १२ प्रवाशी किरकोळी जखमी आहेत. गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना ग्रामिण रुग्णालय गडचांदूर येथे उपचारार्थ नेले. बसमध्ये ३५ ते ४० प्रवाशी प्रवास करीत होते.

error: Content is protected !!