खाजगी शिकवणी चालकाचा प्रताप
शिक्षक पेक्षाला काळिमा फासणारी घटना
पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
राजुरा : तालुक्यात मानवतेला लाज आणणारी घटना समोर आली आहे. फक्त 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने एका मुलाला जन्म दिला आहे. आठवीत शिकणाऱ्या मुलीवर तिच्या शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकांकडूनच शारीरिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला. राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत पांढरपौनी या गावात ही घटना घडली आहे. याबाबत पीडितेच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवताच पोलिसांनी नराधम आरोपीला ताब्यात घेत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
. पोलीस सूत्रानुसार पिडीत मुलीच्या वडिलांनी पारिवारिक विश्वासाचे संबंध म्हणून गावातील एका उच्च शिक्षित युवकाकडे आठव्या वर्गात शिकणाऱ्या आपल्या तेरा वर्षाच्या मुलीचे गणेश मोरे या उच्च शिक्षित तरुणाकडे आठवीचे शिकवणी वर्ग लावले होते. यादरम्यान शिक्षकाने त्या मुलीसोबत जवळीक साधत तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध साधल्याने तिला दिवस गेले. यादरम्यान तिला कोणताही त्रास होत नसल्याने आई वडिलांच्या लक्षात आले नाही. मात्र जेव्हा लक्षात आले, तेव्हा वेळ निघून गेली आणि ती सात महिन्याच्या बाळाची आई झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
. सर्वत्र इंग्रजी शाळेचे आणि ट्युशन क्लासेसचे वेड लागले असून ग्रामीण भागात सुद्धा आपला मुलगा मुलगी इंग्रजी शाळेत शिकला पाहिजे म्हणून त्यांना तालुक्याच्या ठिकाणी पाठविले जात आहे. त्यांनतर त्यांना शिकवणी वर्ग लावण्यासाठी शहरात सोईचे ठरत नसल्याने गावात उच्च शिक्षित असतील त्यांच्याकडेच ट्युशन क्लासेस लावले जात आहे. असाच प्रकार तालुक्यातील पांढरपौनी या गावात घडला आहे. अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांचे पारिवारिक विश्वासू संबंध असलेल्या गावातील गणेश मोरे या उच्च शिक्षित तरुणाकडे शिकवणी वर्ग लावले होते.
मुलीगी 7 महिन्याची गरोदर : या शिक्षकाने शिकवणीच्या नावावर अल्पवयीन मुलीवर मागील काही महिन्यांपासून अत्याचार करीत होते. दोन दिवसांपूर्वी पोटात दुखत असल्याचे मुलीने आईला सांगितले असता आईने मुलीला राजुरा येथील खाजगी रुग्णालयात डॉक्टरांना दाखविले. असता त्यांना मुलगी 7 महिन्याची गरोदर असल्याचे सांगण्यात आल्याने धक्का बसला. तिला त्यांनी चंद्रपूर येथे जाण्याचा सल्ला दिला असता मुलीच्या आई वडीलांनी मुलीला चंद्रपूर येथिल खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता त्याच रुग्णालयात अल्पवयीन मुलीला बाळ जन्माला आले ही बाब राजुरा पोलिसांना माहीत होताच मुलीच्या बयाणानुसार आरोपी गणेश मोरे यांना (दि. १६) ला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


